38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामादिनो मोरियाची झाली तब्बल ८ तास चौकशी

दिनो मोरियाची झाली तब्बल ८ तास चौकशी

६५ कोटींच्या मिठी नदी सफाई घोटाळा

Google News Follow

Related

मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ८ तास चौकशी केली. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळपासून मोरियाची या प्रकरणात चौकशी सुरू होती. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई केल्याचे सांगण्यात येत होते, मात्र त्याची चौकशी करून नंतर त्याला सोडण्यात आले.

मिठी नदीच्या गाळ उपशासाठी देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेला सुमारे ६५.५४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी केतन कदम याच्या कॉल रेकॉर्डमध्ये दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्याशी झालेल्या संपर्काची माहिती तपास यंत्रणेला मिळाल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मे २०२५ मध्ये दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती.

तपासात मोरिया कुटुंबीयांचे प्रकरणातील आरोपींशी असलेले व्यावसायिक आणि आर्थिक संबंधही तपासले जात आहेत. दिनोचा भाऊ सँटिनो रोको मोरिया आणि आरोपी केतन कदम यांच्या पत्नी पुनिता कदम हे UBO Ridez Private Limited या कंपनीचे संचालक होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.

मिठी नदीच्या गाळ उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष उपकरणांच्या निविदा प्रक्रियेतही अनियमितता झाल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. तपासानुसार, काही महापालिका अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये कोची येथे जाऊन गाळ उपशासाठी लागणारी उपकरणे खरेदी केली. त्यानंतर काढण्यात आलेल्या निविदांमध्ये याच उपकरणांच्या वैशिष्ट्यांशी जुळणाऱ्या अटी ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी आलेल्या कंत्राटदारांना केतन कदम आणि जयेश जोशी यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानंतर उपकरणे विकण्याऐवजी कथितरीत्या जास्त दराने भाड्याने देण्यात आल्याचा आरोप आहे. मिठी नदीतून काढण्यात आलेल्या गाळाच्या प्रमाणाच्या नोंदींमध्येही फेरफार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे.

हे ही वाचा:

जंतर-मंतरवरील आंदोलनातून सौरभ भारद्वाजांसह १५० जण ताब्यात

“हल्ला झाला तेव्हा हनुमान चालीसा म्हणत होतो, हनुमानजींनीच वाचवले!”

“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा

मिठी नदीच्या सुमारे १७.८४ किलोमीटरच्या पट्ट्यातील गाळ उपशाच्या कामातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०२४ मध्ये विशेष तपास पथक स्थापन केले होते. कंत्राट प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि संबंधित अधिकारी-कंत्राटदारांच्या भूमिकेचा या प्रकरणात तपास करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा