29 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरक्राईमनामाडॉक्टरची पदवी नाही, तरी थाटात दवाखाने

डॉक्टरची पदवी नाही, तरी थाटात दवाखाने

मुंबईत ७ क्लिनिकवर छापे, १० बोगस डॉक्टरांवर कारवाई

Google News Follow

Related

कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही स्वतःला डॉक्टर भासवून नागरिकांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ (घाटकोपर) आणि महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मुंबईतील सात क्लिनिकवर छापे टाकून तब्बल १० बोगस डॉक्टरांवर कारवाई केली.

या कारवाईत सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीची औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.
गुप्तरोगांसारख्या संवेदनशील आजारांवर ऍलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने उपचार करण्याचे आमिष दाखवून रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याचे कारवाईत समोर आले. विशेष म्हणजे, काही ठिकाणी कालबाह्य झालेली युनानी आणि आयुर्वेदिक औषधे रुग्णांना देण्यासाठी ठेवण्यात आल्याचेही आढळून आले.

हे ही वाचा:

महिलांच्या सायबर छळावर तातडीने कारवाई करा

पराभवाच्या नैराश्येतून काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांची बदनामी

हरमनप्रीत कौरने सोडले कर्णधारपद

फॉर्म ६ बाबत राहुल गांधींच्या आरोपांची संबित पात्रांनी केली पोलखोल

भांडुप परिसरातील संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना, बोरीवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरमधील दिपक हर्बल हेल्थ केअर तसेच मानखुर्दमधील समर आयुर्वेदिक दवाखाना येथे ही कारवाई करण्यात आली. मानखुर्द येथील कारवाई कक्ष ६च्या माध्यमातून करण्यात आली.
कारवाईदरम्यान औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक टॅब्लेट्स आणि अन्य वैद्यकीय साहित्य असा सुमारे २.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैद्यकीय पात्रता आणि अधिकृत नोंदणी नसतानाही उपचार करणाऱ्या व्यक्तींमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ मधील कलम ३३ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अशा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाविरोधात कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा