29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेषमहिलांच्या सायबर छळावर तातडीने कारवाई करा

महिलांच्या सायबर छळावर तातडीने कारवाई करा

Google News Follow

Related

महिलांचे डीपफेक व्हिडीओ, मॉर्फ केलेले फोटो आणि सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवणाऱ्या समाजकंटकांवर मुंबई पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले. महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

रहाटकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांचा सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘विमेन हेल्प डेस्क’, महिला हेल्पलाइन, कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी, सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा आणि सायबर गुन्हे यांबाबत मुंबई पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

डिजिटल पुरावे सुरक्षित करण्याचे निर्देश

सोशल मीडियावर महिलांचे फोटो अथवा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने वापरून त्यांची बदनामी करण्याचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढले आहे. अशा प्रकारच्या छळामुळे महिलांना तीव्र मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा तक्रारी दाखल होताच पोलिसांनी तातडीने डिजिटल पुरावे सुरक्षित करून कायदेशीर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.

‘हेल्प डेस्क’चा घेतला आढावा

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विमेन हेल्प डेस्क’ कार्यरत आहे का आणि महिला हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर पोलीस किती वेळेत मदतीसाठी पोहोचतात, याची तपासणी यावेळी करण्यात आली. संकटात सापडलेल्या महिलेपर्यंत पोहोचण्याच्या ‘रिस्पॉन्स टाईम’चे सातत्याने मॉनिटरिंग करण्यात यावे, अशी अपेक्षा रहाटकर यांनी व्यक्त केली.

कौटुंबिक हिंसाचारात संवेदनशीलता आवश्यक

मुंबई पोलिसांकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींवर वेळेत पावले उचलल्यास अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. त्यामुळे या प्रकरणांत पोलिसांनी अधिक संवेदनशीलतेने काम करावे. तसेच वन स्टॉप सेंटर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बालविकास विभाग आणि संरक्षण अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवावा, असेही त्या म्हणाल्या. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी गस्त, पथदिवे आणि सीसीटीव्ही नेटवर्कवर भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण

महिलांशी संबंधित संवेदनशील गुन्हे आणि सायबर प्रकरणे हाताळताना पोलिसांची संवेदनशीलता वाढावी, यासाठी राष्ट्रीय महिला आयोग व मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

“जिथे जिथे सायबर गुन्हे किंवा महिलांचा छळ होण्याच्या घटना घडतात, तिथे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता कडक कारवाई केली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

— विजया रहाटकर, अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा