37 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरदेश दुनियाचीनचा पुन्हा दावा, ‘संपूर्ण लडाख आमचा’

चीनचा पुन्हा दावा, ‘संपूर्ण लडाख आमचा’

भारताने २८ ठिकाणांना दिलेल्या नावांवर चीनचा आक्षेप

Google News Follow

Related

लडाखमधील २८ महत्त्वाच्या ठिकाणांना आणि भौगोलिक वैशिष्ट्यांना अधिकृत नावे देण्याच्या भारताच्या निर्णयाला चीनने तीव्र विरोध केला आहे. संपूर्ण लडाख आपलाच असल्याचा दावा करत भारताने या प्रदेशावर एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप चीनने केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी बीजिंगमधील पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. भारताने निर्माण केलेल्या लडाख केंद्रशासित प्रदेशाला चीनने मान्यता दिलेली नसल्याचेही त्या म्हणाल्या.

भारताने २ ऑक्टोबर रोजी लडाखमधील २८ सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना अधिकृत नावे दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने निश्चित केलेल्या या नावांचा भारताच्या अधिकृत नकाशांमध्ये समावेश करण्यात आला. लडाख प्रशासनाशी चर्चा करून ठिकाणांची ओळख निश्चित करणे, नकाशांमधील नोंदी सुसंगत करणे आणि संवेदनशील सीमावर्ती भागांबाबत जनजागृती वाढवणे हा यामागील उद्देश आहे.

या यादीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स यांसारख्या महत्त्वाच्या भागांचाही समावेश आहे. भारताची ही कृती बेकायदेशीर आणि अमान्य असल्याचे सांगत, यामुळे भारत-चीन सीमेच्या पश्चिम भागावरील चीनचा दावा बदलणार नसल्याचे माओ निंग यांनी म्हटले. गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स हे सीमावादाच्या दृष्टीने महत्त्वाचे भाग आहेत. ५ मे २०२० रोजी पँगाँग सरोवर परिसरात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक चर्चा सुरू झाली. २०२२ पासून काही ठिकाणी सैन्य माघारीची प्रक्रिया पुढे नेण्यात आली.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची स्वच्छता मोहीम जोरात!

राणीनं डाव जिंकला…सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत अजितदादा पॅनल २१-०

जुनी मतदार यादी, हातावरच्या गोंदणामुळे २४ वर्षांनी सापडली हरवलेली बहीण

जंतर मंतरमध्ये घुसलेल्या ‘कॉक्रोच’ना घेतले ताब्यात

भारताचे प्रत्युत्तर

चीनचे दावे भारताने फेटाळले आहेत. लडाख हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केली. सर्वे ऑफ इंडियाच्या नकाशांमध्ये २८ ठिकाणांची नावे समाविष्ट करण्याचा निर्णय स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून घेण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले. या घडामोडींमुळे भारत-चीनमधील सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा