कॉकरोच जनता पार्टीचा आम आदमी प्रायोजित अभिजित दीपक असो वा प्रशांत भूषणसारखा देशद्रोही वकील किंवा नेहा बोरासारखी डावी कार्यकर्ती. यांच्या मागे किती लोक आहेत, हे २ ऑक्टोबरपासून दिल्लीत जो आंदोलन-तमाशा सुरू आहे, त्यातून बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. कॉकरोच आणि सगळी इंडिया आघाडी मिळून गेल्या १५ दिवसांत जेमतेम २० हजार लोक रस्त्यावर आले; देशाच्या लोकसंख्येचा विचार करता ही संख्या मूठभरही नाही. तरीही त्यांना कोट्यवधी लोकांनी सत्तेवर बसवलेले सरकार बदलायचे आहे. या आंदोलनाचा अनौरस बाप कोण आहे, हे संयुक्त राष्ट्रांतील एका अहवालावरून समोर आले आहे. अशाच उचापतींमुळे संयुक्त राष्ट्रांची विश्वासार्हता संपुष्टात आली असल्याची सणसणीत प्रतिक्रिया भारताने या अहवालावर दिलेली आहे. गेले दोन आठवडे जे मीडियातून किंवा सोशल मीडियातून समोर येत आहे, ते पाहून एखाद्याला वाटेल हा देश अराजकाच्या दारात उभा आहे. प्रचंड राजकीय अस्थिरतेमुळे कधी कोसळेल याचा नेम नाही. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. वाढलेले जीएसटी कलेक्शन, वाहनांची जोरदार विक्री, देशात असलेला परकीय चलनाचा भरपूर साठा, निर्यातीचे वाढलेले आकडे, घसरत चाललेली चालू खात्यातील तूट अशा कोणत्याही निकषावर आपण जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत उत्तम कामगिरी करत आहोत. आशियाई क्रीडास्पर्धेत आपल्या तरुणाईने पदकांची लयलूट केली. जगाचा विचार करता देशात महागाईही नियंत्रणात आहे. परंतु यांपैकी कोणत्याही गोष्टीची देशात चर्चा होत नाही. विदेशी वर्तमानपत्रांतही फक्त आणि फक्त कॉकरोच आंदोलनाच्या बातम्या पेरल्या जात आहेत.



