32 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण‘स्कूल ठीक करो’ अभियानामुळे फ्रान्समध्ये पेटला वणवा... |

‘स्कूल ठीक करो’ अभियानामुळे फ्रान्समध्ये पेटला वणवा… |

Related

देशात अराजक कसे निर्माण केले जाते, सुरुवातीला निरुपद्रवी वाटणाऱ्या उपक्रमामुळे देशात वणवा कसा पेटतो आणि जनतेचा आवाज जिहादींकडून हायजॅक कसा होतो, याचे फ्रान्स हा देश जिवंत उदाहरण बनलेला आहे. फ्रान्समध्ये दंगे, जाळपोळ, लुटालुटीच्या घटनांना उत आला आहे. शेकडो कोटींची मालमत्ता आगीत भस्मसात झाली आहे आणि तेवढीच लुटली गेली आहे. हजारो सर्वसामान्य लोकांना याची झळ बसली आहे. जगभरातील वर्तमानपत्रांत याबाबत रकानेच्या रकाने भरून बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या अराजकाची सुरुवात ‘लायसी मुव्हमेंट’ या चळवळीपासून झाली. ‘लायसी’चा अर्थ माध्यमिक शाळा. आपल्याकडे सुरू झालेले ‘स्कूल ठीक करो’ आंदोलन याच वळणावर नेण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रशांत भूषण या वकिलाने या मनसुब्याचा भांडाफोड केला. युरोप जळतो आहे. फ्रान्स, बेल्जियम, इटली, स्पेन या देशांमध्ये अराजकवादी आंदोलने सुरू आहेत. फ्रान्स सरकारने हजारो आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. लाठीमार, अश्रूधूर, रबर बुलेट यांचा वापर आंदोलकांवर केला जातो आहे. ही सगळी आंदोलने अशा काही कारणांतून पेटली, जे कारण सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे होते. परंतु काही काळानंतर या आंदोलनाचा ताबा देशद्रोही तत्त्वांनी घेतला; अशा मानसिकतेने घेतला ज्यांना समाजात आग पेटवायची आहे आणि तापलेल्या आगीवर पोळी भाजायची आहे. फ्रान्समध्ये जे घडते आहे, ते भारतीयांनी अत्यंत डोळसपणे पाहिले पाहिजे; कारण भारतासाठीही हीच स्क्रिप्ट लिहिली गेली होती. भारतालाही फ्रान्सच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न होता. भारतीय जनता आणि मोदी सरकारने हे होऊ दिले नाही.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा