29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामागरब्यात मुस्लीम तरुणाची हुल्लडबाजी; विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला थप्पड

गरब्यात मुस्लीम तरुणाची हुल्लडबाजी; विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला थप्पड

नालासोपाऱ्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन परिसरात गरबा कार्यक्रमादरम्यान एका मुस्लीम तरुणाच्या हुल्लडबाजीचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन आणि अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद गुर्फान शेख याला एका मुलीने जाब विचारला. मात्र, आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्याने मुलीला थप्पड मारल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी तरुणाला जाब विचारताना आणि त्याच्या कॉलरला हात घालताना दिसते. दोघांमधील वाद वाढल्यानंतर मुलगी त्याला ढकलते आणि त्यानंतर तरुण तिला थप्पड मारताना दिसतो. गरबा कार्यक्रमासारख्या सार्वजनिक ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर हात उचलल्याच्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, मुलीला थप्पड मारल्यानंतर तरुणाने, “तुम्हाला जे करायचे ते करा, मला कायद्याची भीती नाही,” अशा आशयाचे वक्तव्य केले.

हे ही वाचा:

काही महत्त्वाकांक्षी नेते भारताला कमकुवत करू पाहत आहेत

“पॅरिस लवकरच बनणार मुस्लिम शहर!”

एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य

प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते

घटनेच्या व्हिडीओमध्ये अनेक लोक उपस्थित असल्याचे दिसते. मात्र, मुलीला थप्पड मारली जात असताना कोणीही पुढे येऊन हस्तक्षेप करताना दिसत नसल्याने बघ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हायरल व्हिडीओबाबत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने दखल घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील तक्रारीनंतर संबंधित माहिती आवश्यक कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा