29.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराहुल गांधींचे पुन्हा 'मिलते है ब्रेक के बाद...' |

राहुल गांधींचे पुन्हा ‘मिलते है ब्रेक के बाद…’ |

Related

आकाशवाणी भवन, जंतर मंतर, सर्वोच्च न्यायालय आदी ठिकाणी बराच धिंगाणा घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा परदेशात ब्रेकवर गेलेले आहेत. काल ते व्हिएतनामला रवाना झाले. तिथे सालाबादप्रमाणे त्यांच्या काही गाठीभेटी होतील. त्याची भारतात उलटसुलट चर्चा होईल, परंतु त्यांना याचा फार फरक पडताना दिसत नाही. दोन कॉकरोच तिहार तुरुंगात आहेत. १ नोव्हेंबरला काँग्रेसने नवी दिल्लीतील रामलीला मैदानात रॅलीचे आयोजन केलेले आहे. या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून राहुल गांधी पर्यटनाला निघालेले आहेत. सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण देऊन यजमान स्वतः घरातून गायब व्हावा तसा प्रकार राहुल गांधी यांनी केलेला आहे. फरक एवढाच, त्यांचा संबंध सत्यनारायणाशी कमी आणि असत्यनारायणाशी जास्त आहे. सत्ताधारी आणि विरोधक, राष्ट्रभक्त आणि देशविरोधक यांच्यात तुंबळ संघर्ष सुरू आहे. त्याचा निकाल लागण्याच्या आधी राहुल गांधी यांना पर्यटनाची सुरसुरी यावी हे अनाकलनीय असले तरी ते त्यांच्या स्वभावाला धरून आहे. एखादे नावडते काम जेव्हा माणूस करतो, तेव्हा ती ढकलगाडी असते; कंटाळत काम करायचे, रविवार कधी येतोय त्याची वाट पाहायची. ज्याला कामात गंमत असते, कामावर निष्ठा असते, त्याचा आठवडा कसा जातो ते त्यालाही कळत नाही. राहुल गांधी यांची समस्या तीच आहे. ते पूर्णवेळ राजकारणी नाहीत. राजकारण हा त्यांचा पिंड नाही. राजकरणाबाबत ते गंभीर नाहीत. पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह यांनी गेल्या १२ वर्षांच्या काळात सुट्टी घेतल्याचे किंवा ब्रेक घेतल्याचे ऐकिवात नाही. राहुल गांधी वर्षातून दोनदा घेतात. दोघांच्या कामगिरीमध्ये जो फरक आहे, त्याला दोन वेगळ्या मानसिकताही कारणीभूत आहेत.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा