29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेष‘रामायण’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ४.८८ कोटींची कमाई

‘रामायण’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ४.८८ कोटींची कमाई

मुंबईत तिकिटाचा दर तब्बल २,७७० रुपये

Google News Follow

बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता ऍडव्हान्स बुकिंगमधून दिसून येत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटाने बुकिंग सुरू झाल्यानंतर एका दिवसाच्या आत देशभरात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील काही प्रीमियम आयमॅक्स ३डी शोसाठी रिक्लायनर सीटचे तिकीट तब्बल २,७७० रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईसोबतच तिकिटांच्या दरांचीही चर्चा रंगली आहे.

‘रामायण : द राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगला २० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने देशभरात सुमारे ४.८८ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली होती. या कालावधीत जवळपास ८५ हजार तिकिटांची विक्री झाली होती. ब्लॉक बुकिंग वगळल्यानंतर हा आकडा ३.०५ कोटी रुपये होता.

शहरनिहाय बुकिंगमध्ये दिल्ली-एनसीआर आघाडीवर होते. तेथे सुमारे १.४२ कोटी रुपयांची तिकीटविक्री झाली, तर मुंबईतून १.०१ कोटी रुपयांची कमाई झाली. पुणे, कोलकाता आणि बंगळुरू येथूनही चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. भाषानिहाय बुकिंगमध्ये हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून, कन्नड आणि तेलुगू आवृत्त्यांसाठीही तिकिटांची विक्री झाली आहे.

मुंबईत तिकिटाचे दर २,७७० रुपयांवर

चित्रपटाच्या तिकिटांच्या किमतींनीही लक्ष वेधले आहे. मुंबईतील लोअर परळ येथील पीव्हीआर आयकॉन: फिनिक्स पॅलेडियममध्ये ५ आणि ६ नोव्हेंबरच्या काही आयमॅक्स ३डी शोसाठी रिक्लायनर सीटचे तिकीट २ हजार ७७० रुपये ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हवा सोशल मीडियावर मंदावली?

ज्ञानेशकुमार प्रकरणावर बोलण्यास रुबिओंचा स्पष्ट नकार

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची प्रतिमा डागाळू नका!

टायगर प्रकरणात दादर कनेक्शन…दोन तरुणीही कटात सामील

या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल, रवि दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दोन भागांत साकारल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा