28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरराजकारणअमित शाह यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी राहुल गांधी निर्दोष

अमित शाह यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी राहुल गांधी निर्दोष

विशेष खासदार-आमदार न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने सोमवारी (२६ ऑक्टोबर) हा निर्णय दिला. राहुल गांधी यांची टिप्पणी मानहानीकारक स्वरूपाची नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल सुनावण्यात आला, तेव्हा राहुल गांधी न्यायालयात उपस्थित होते.

२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरू येथे राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याबाबत टिप्पणी केली होती. भाजपच्या तत्कालीन अध्यक्षांवर खुनाच्या प्रकरणात आरोपी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. या विधानामुळे अमित शाह यांची बदनामी झाल्याचा दावा करत भाजप नेते आणि सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला दिवाणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे प्रकरण खासदार-आमदार न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.

न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२४ रोजी ते न्यायालयात हजर झाले. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. या प्रकरणात राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याची संबंधित भाषणाच्या ध्वनिमुद्रणाशी तुलना करण्याची मागणी तक्रारदाराच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यानंतर सत्र न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयानेही ही मागणी मान्य केली नाही.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या

वाराणसीच्या एअर शोदरम्यान लष्करी अधिकारी असल्याचा बनाव

गुजरातमध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी मच्छीमारांना अटक

ब्राझीलमध्ये डाव्या विचारसरणीचे लुला दा सिल्व्हा चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष

या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी २६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार राहुल गांधी सोमवारी न्यायालयात उपस्थित राहिले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शुभम वर्मा यांनी निकाल सुनावला. राहुल गांधी यांची संबंधित टिप्पणी मानहानीकारक नसल्याचे न्यायालयाने नमूद करत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा