30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरबिजनेसपश्चिम आशियातील शांततेच्या आशेने कच्चे तेल स्वस्त

पश्चिम आशियातील शांततेच्या आशेने कच्चे तेल स्वस्त

ब्रेंट क्रूड ११४.७२ डॉलरवर प्रति बॅरलवर

Google News Follow

पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. इराण, सौदी अरेबिया आणि या प्रदेशातील अन्य देशांदरम्यान चर्चेच्या माध्यमातून संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना वेग मिळाल्याने जागतिक तेलपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. अलीकडच्या काळात युद्धजन्य परिस्थिती आणि तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र, आता चर्चेतून शांततेचा मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेल बाजाराला काहीसा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १ डॉलरने घसरून ११४.७२ डॉलरवर आला, तर अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय) कच्च्या तेलाचा दर ०.९२ टक्क्यांनी घसरून १००.८३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ११७ डॉलरच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे अलीकडील घसरण ही तेल बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
हे ही वाचा:
आजारपणाचा बहाणा करून तामिळनाडूच्या तुरुंगातून १७ कैदी फरार

एआय खर्चवाढीमुळे मायक्रोसॉफ्टच्या ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची ऑफर

जम्मू-काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; चार मंत्र्यांचा शपथविधी

२०३० पर्यंत सार्वजनिक कर्ज जीडीपीच्या ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य

दरम्यान, इराण आणि सौदी अरेबियासह संबंधित देशांमधील तणाव पूर्णपणे निवळलेला नसल्याने तेलाच्या किमतींबाबत अनिश्चितता कायम आहे. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असून, जगातील सुमारे २० टक्के तेलपुरवठा या मार्गातून होतो. या परिसरातील जहाजांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन किमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे राजनैतिक चर्चांमधून स्थायी तोडगा निघतो का, याकडे ऊर्जा बाजाराचे लक्ष लागले आहे. कच्च्या तेलाच्या दरातील घसरण भारतासाठीही महत्त्वाची आहे, कारण तेलाच्या किमती कमी झाल्यास आयात खर्च, महागाई आणि इंधनाच्या किमतींवरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा