31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरक्राईमनामाअरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

एनसीबीसह सुरक्षा यंत्रणांची संयुक्त कारवाई

Google News Follow

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि सहयोगी यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ४५८ एकर क्षेत्रावरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त केली आहे. एनसीबीच्या इटानगर विभागीय पथकाने सशस्त्र सीमा बल (एसएसबी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील कलाकतांग उपविभागात २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त पथकांनी प्रामुख्याने सामुदायिक जमिनींवर लागवड केलेली १.३७ लाख किलोग्रॅमहून अधिक गांजाची झाडे नष्ट केली. या कारवाईत एसएसबी, सीआरपीएफ, अरुणाचल प्रदेश अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स, पश्चिम कामेंग पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील एकूण ११८ कर्मचारी सहभागी झाले होते.

पश्चिम कामेंग पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणासोबतच एनसीबीने उपलब्ध करून दिलेल्या उपग्रह छायाचित्रांची मदत घेण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागांमध्ये असलेल्या गांजाच्या लागवडीच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे पथकांना शक्य झाले.

२०२६ मध्ये आतापर्यंत अरुणाचल प्रदेशात अवैध गांजाच्या शेतीपासून मुक्त केलेले एकूण क्षेत्र २०२५ मधील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत आठ पटींहून अधिक असल्याचे एनसीबीने सांगितले. एनसीबीने संपूर्ण राज्यात गांजा आणि अफूची अवैध लागवड होत असलेल्या भागांची ओळख पटवली आहे. आगामी काळात संयुक्त मोहिमांद्वारे या भागांमध्येही कारवाई केली जाणार आहे. यात लोहित, लोअर दिबांग व्हॅली, नामसाई, अंजाव, तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग या जिल्ह्यांतील अफूच्या लागवडीच्या ठिकाणांचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी

ही मोहीम ‘नार्कोटिक्स कंट्रोल व्हिजन डॉक्युमेंट (२०२६-२०२९)’ अंतर्गत राबवली जात आहे. या धोरणानुसार अवैध अमली पदार्थांच्या लागवडीचे प्रमुख केंद्र ओळखणे आणि केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील यंत्रणांमध्ये समन्वय साधून अशा पिकांची लागवड नष्ट करण्यावर भर दिला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा