29.2 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरदेश दुनियाइराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती देणाऱ्याला २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती देणाऱ्याला २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस

अमेरिकेकडून घोषणा

Google News Follow

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत गुप्त माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे, उपकरणे आणि व्यक्तींबाबत माहिती देणाऱ्यांना अमेरिकेकडून २० दशलक्ष डॉलरपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय माहिती देणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) शुक्रवारी ही घोषणा केली.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘रिवॉर्ड्स फॉर जस्टिस’ या कार्यक्रमांतर्गत ही बक्षीस योजना राबवली जात आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांची माहिती तसेच अणुप्रकल्पांमधील उपकरणे आणि त्यांच्या हालचालींबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमेरिकेने या घोषणेमागे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीशी संबंधित चिंता व्यक्त केली आहे. इराणने संस्थेच्या सुरक्षा उपाययोजनांशी संबंधित जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यामुळे अणुऊर्जा कार्यक्रमातील महत्त्वाच्या घटकांच्या उत्पादनाचा आणि साठ्याचा मागोवा घेण्याची क्षमता कमी झाल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. यामध्ये युरेनियम संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या सेंट्रीफ्यूजचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिकी हल्ल्यांमुळे तेथील अणुकार्यक्रमाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखण्यासाठी काही लक्ष्यांवर अद्याप लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इराणने काही ठिकाणे अणुप्रकल्प असल्याचे दावे फेटाळले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा