29.2 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषकन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर दहशतवादाचा खटला चालणार!

कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर दहशतवादाचा खटला चालणार!

राजस्थान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Google News Follow

जयपूरच्या कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींवर आता दहशतवादाच्या आरोपांखाली खटला चालवला जाणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाने यावर शिक्कामोर्तब केले. विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने हे आदेश योग्य ठरवत त्यांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

मुख्य न्यायमूर्ती संजय के. अग्रवाल आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचे आदेश वैध ठरवले आहेत. मोहम्मद रियाज अत्तारी, मोहम्मद गौस, मोहसीन खान, आसिफ हुसैन, मोहम्मद मोहसिन, वसीम अली, मोहम्मद जावेद खान आणि मुस्लिम खान या आरोपींविरोधातील खटला एनआयए न्यायालयात सुरूच राहणार आहे.

एनआयए न्यायालयात आरोपींविरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १८ (दहशतवादी कट) आणि कलम २० (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) यांसह भारतीय दंड संहितेतील अन्य गंभीर कलमांनुसार खटला चालवला जात आहे.

कन्हैयालाल हत्या प्रकरणात, एनआयए विशेष न्यायालयाने आरोपीवर दहशतवादाशी संबंधित कलमांसह विविध कलमांखाली आरोप निश्चित केले होते. या कलमांखालील खटला आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला आव्हान देत आरोपीने राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. आरोपीने विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता.

प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर, उच्च न्यायालयाने आरोपीचे युक्तिवाद स्वीकारले नाहीत आणि सर्व आठ याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने स्पष्ट केले की, एनआयएच्या विशेष न्यायालयाच्या आरोप निश्चितीच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास कोणताही आधार नाही. यामुळे आरोपींवर दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला.

हे ही वाचा:

अंडरवर्ल्ड डॉन हेमंत पुजारी ‘रॉ’च्या ताब्यात

लोकलमध्ये हाणामारी; प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडला

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

कन्हैयालाल कोण होते ?

कन्हैयालाल हे उदयपूरमधील शिंपी होते. २८ जून २०२२ रोजी ते आपल्या दुकानात असताना आरोपींनी विश्वासघाताने त्यांची निर्घृण हत्या केली होती. या हत्येचा व्हिडिओ चित्रित करून आरोपींनी तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा