29.2 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषप्रकाशाचा सण अंधःकार विरोधातील संकल्पाचे प्रतीक

प्रकाशाचा सण अंधःकार विरोधातील संकल्पाचे प्रतीक

पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचे पावन पर्व संपूर्ण देशाला दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकत असल्याचे त्यांनी म्हटले. प्रकाशाचा हा सण अंधःकार विरोधातील संकल्पाचे प्रतीक असल्याचे सांगत, हा सण आणि येणारा काळ सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.

दरम्यान, भारतीय सशस्त्र दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दरवर्षी दिवाळीनिमित्त ते सीमेवर तैनात असलेल्या जवानांची भेट घेतात आणि त्यांच्यासोबत हा सण साजरा करतात. यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळी जवानांसोबत साजरी करण्यासाठी सीमावर्ती भागात जातात.

हे ही वाचा:

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या निमित्तानेही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या होत्या. एक्सवरील पोस्टद्वारे त्यांनी भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य नांदो, अशी कामना केली होती. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले होते की, भगवान धन्वंतरी यांच्या दिव्य कृपेने सर्वांचे जीवन सुख, शांती आणि उत्तम आरोग्याने सदैव उजळून निघो. प्रत्येक कुटुंबात उत्साह आणि आनंदाचा अखंड दिवा तेवत राहो, हीच सदिच्छा. यासोबतच त्यांनी भगवान धन्वंतरी यांच्या स्तुतीतील संस्कृत श्लोकही शेअर केला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा