30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरक्राईमनामालोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

प्लॅटफॉर्मवरून फेकलेले धारदार शस्त्र थेट छातीत घुसले

Google News Follow

मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीबरोबरच प्रवाशांमधील वाद आणि हाणामारीच्या घटनाही वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच धावत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी स्थानकात झालेल्या वादानंतर एका तरुणाने धावत्या लोकलच्या डब्यात धारदार शस्त्र फेकले. हे शस्त्र दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ५२ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसले. या घटनेत सुरेश द्वारका शर्मा गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, सुरेश द्वारका शर्मा हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून, सायन-धारावी परिसरात राहतात. ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त ते बोरीवली पूर्व येथे गेले होते. काम संपल्यानंतर दुपारी ११ वाजून ५८ मिनिटांनी त्यांनी बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल पकडली. ते पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे होते.

याच डब्यात मागील बाजूला बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. अंधेरी स्थानक येईपर्यंत हा वाद वाढला. लोकल अंधेरी स्थानकात थांबताच त्यापैकी एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला. लोकल पुढे निघताच प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणाने धारदार शस्त्र डब्याच्या दिशेने फेकले. हे शस्त्र थेट सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसले. त्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

भारत आणखी एक हजार विमाने खरेदी करणार

मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष

लोकल बांद्रा स्थानकात पोहोचल्यानंतर आरपीएफ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना तातडीने मदत केली. त्यानंतर त्यांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिवाजी गायकवाड (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा