28 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरविशेषमुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले

सलग दोन दिवस विमानांचे उड्डाण विस्कळीत

Google News Follow

स्पाइसजेटच्या विस्कळीत विमानसेवेचा फटका मुंबई विमानतळावरील शेकडो प्रवाशांना बसला आहे. सलग दोन दिवस विमानांच्या उड्डाणांना विलंब झाल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. सोमवारी टर्मिनल १ मधून एकही विमान उड्डाण करू शकले नाही, तर मंगळवारीही रात्री उशिरापर्यंत विमानसेवा सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी कंपनीच्या काउंटरवर गर्दी करत घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून अनेक प्रवासी विमानतळावर उड्डाणाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या विमानांचे उड्डाण झाले नाही. अखेर काही विमानांनी बुधवारी पहाटे सुमारे चार वाजता उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना जवळपास नऊ तास विलंबाचा सामना करावा लागला. रात्री ११.३० वाजता उड्डाण नियोजित असलेल्या विमानाचे बोर्डिंगही वेळेवर सुरू झाले नव्हते.

सोमवारीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विमान पकडण्यासाठी आलेल्या काही प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना विमानतळाबाहेरच थांबावे लागले. उड्डाणांना होणाऱ्या विलंबाची कारणे आणि सुधारित वेळापत्रक याबाबत कंपनीकडून पुरेशी माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा संताप वाढला. प्रभावित प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत करण्याची सुविधा देण्यात आली असून, सात दिवसांत रक्कम खात्यात जमा होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?

मनातून माफी नको, मनापासून माफी मागा!

पंतप्रधान मोदींच्या विमानाचे सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती!

न्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल आमदाराला समन्स

दरम्यान, स्पाइसजेटच्या परिचालनविषयक अडचणींची चर्चा सुरू असतानाच गेल्या आठवड्यात दुबईतील ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवणाऱ्या डनाटा कंपनीने ३५.८ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे स्पाइसजेटची चेक-इन सेवा स्थगित केली होती. परिणामी, दुबईतील चार उड्डाणे रद्द करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबई विमानतळ प्रशासनानेही प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी उड्डाणांचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुंबईतील सध्याच्या उड्डाणांना झालेल्या विलंबाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्पाइसजेटकडूनही या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा