29 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेच्या विमान वाहतुकीला तांत्रिक बिघाडांचे ग्रहण

अमेरिकेच्या विमान वाहतुकीला तांत्रिक बिघाडांचे ग्रहण

दहा दिवसांत तीन मोठ्या तांत्रिक अडचणी

Google News Follow

अमेरिकेत गेल्या काही दिवसांत विमान वाहतुकीशी संबंधित तांत्रिक बिघाडांच्या घटनांची मालिका समोर आली आहे. आधी फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या (एफएए) यंत्रणेतील बिघाडामुळे देशभरातील विमान उड्डाणे थांबवण्याची वेळ आली. त्यानंतर युनायटेड एअरलाइन्सच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आणि आता डेल्टा एअर लाइन्सच्या स्वयंचलित प्रणालीनेही दगा दिला आहे. अवघ्या दहा दिवसांत तीन मोठ्या तांत्रिक अडचणी समोर आल्याने अमेरिकेच्या विमान वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक यंत्रणांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डेल्टा एअर लाइन्सच्या विमानांचे वजन आणि संतुलन मोजणाऱ्या (Weight and Balance System) स्वयंचलित प्रणालीत रविवारी (२२ नोव्हेंबर) बिघाड झाला. त्यामुळे अमेरिकेतील प्रमुख विमानतळांवर विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. विमानातील प्रवासी, सामान, मालवाहतूक आणि इंधनाचे एकूण वजन तसेच विमानाचे गुरुत्वमध्य सुरक्षित मर्यादेत आहे की नाही, याची गणना या प्रणालीद्वारे केली जाते. प्रणाली बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना ही गणना हाताने करावी लागली. परिणामी उड्डाणापूर्वीच्या प्रक्रियेला विलंब झाला.

अटलांटा येथील हर्ट्सफिल्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर परिस्थिती अधिक गंभीर झाली. त्यामुळे एफएए ने अटलांटाकडे जाणाऱ्या विमानांसाठी सुमारे तासभर ग्राउंड स्टॉप लागू केला. डेल्टाने दुपारनंतर प्रणाली पूर्ववत केल्याचे जाहीर केले. मात्र, संध्याकाळपर्यंत कंपनीच्या १,९०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला होता. रविवारी कंपनीची सुमारे पाच हजार उड्डाणे नियोजित होती.

हे ही वाचा:

बिसलेरीचे पाणी प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित

प्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देत दांपत्याला लुटले

मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

याआधी एफएए, युनायटेडमध्येही बिघाड

१३ नोव्हेंबरला एफएए च्या दूरसंचार यंत्रणेत बिघाड झाल्याने देशभरातील विमान उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबरला युनायटेड एअरलाइन्सच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाल्याने उड्डाणे प्रभावित झाली होती. आता डेल्टाच्या घटनेने या मालिकेत भर घातली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा