30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरविशेषबदलापुरात भटक्या कुत्र्यांच्या भीतीने १८ वर्षीय मुलाचा मृत्यू

बदलापुरात भटक्या कुत्र्यांच्या भीतीने १८ वर्षीय मुलाचा मृत्यू

कुत्र्यांच्या पाठलागामुळे धावताना हृदयविकाराचा झटका

Google News Follow

बदलापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत सुटलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून, तो बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे बदलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी शिकवणी संपल्यानंतर हर्षल आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेकडील शनीनगर परिसरातून जात होता. त्याचवेळी रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. कुत्रा अंगावर धावून येत असल्याचे पाहून हर्षल घाबरला आणि त्याने जोरात धावण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी धावत तो जवळच्या एका दुकानात शिरला. मात्र, दुकानात पोहोचल्यानंतर काही क्षणांतच तो अचानक कोसळला. मित्रांनी आणि दुकानदाराने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला शुद्ध आली नाही. तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हर्षलवर तीन वर्षांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याच्या भीतीने धावताना हृदयावर ताण आल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. रस्ते, चौक आणि निवासी वस्त्यांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा : 

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

दरम्यान, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेल्टर उभारणे, निर्बीजीकरण आणि लसीकरण यांसारख्या उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या योजना प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवल्या जातात, हा प्रश्न कायम आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तरी प्रशासन ठोस पावले उचलणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा