30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषतरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी 'लक्ष्यवेध'

तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ‘लक्ष्यवेध’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

Google News Follow

राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध १.०’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को समन्वय समितीची एक महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्र, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैस्कर, पोलीस महासंचालक (डीजीपी) सदानंद दाते आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. याशिवाय, राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक (एसपी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कृत्रिम किंवा इतर अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते. त्यामुळे, गुन्हेगार जुन्या, ओसाड कारखान्यांमध्ये, सामान्य घरांमध्ये किंवा अगदी लहान जागांमध्येही त्यांची अवैध निर्मिती करत आहेत. या अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतलेला असल्यामुळे संपूर्ण प्रशासकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न केले जातात. सर्वात चिंताजनक बाब ही आहे की, थोड्या पैशांच्या लोभापायी १४ ते २४ वयोगटातील तरुण-तरुणींचा वापर केवळ अमली पदार्थांच्या सेवनासाठीच नव्हे, तर त्याच्या वितरण साखळीतही केला जात आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे. या लढ्यासाठी पोलिसांसह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, जीएसटी, शालेय व उच्च शिक्षण विभागांनी एकत्रितपणे काम करावे. पुरवठा साखळीवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृती, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनावरही भर द्यावा”, असे निर्देश त्यांनी दिले.

हे ही वाचा:

‘रामायण’ आता गेमिंगच्या दुनियेत!

‘आप’चा चौथा आमदार अकाली दलाच्या गोटात!

व्यसनाधीनता, अमली पदार्थ हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे अडथळे

त्रिपुरात बीएसएफ जवानांवरील हल्ला करणाऱ्यांच्या घरांवर हातोडा

अभियानासाठी राज्यातील २० प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सहा प्रमुख स्तंभांवर आधारित २१ कृती मुद्दे ठरविण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय एनसीओआरडी समित्यांच्या कामगिरीसाठी ४० निकष आणि ६५० गुणांची मूल्यमापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. कामगिरीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘ड्रग फ्री स्कूल’ आणि ‘ड्रग फ्री व्हिलेज’ उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याची माहिती दिली. तर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अमली पदार्थ तस्करीतील आर्थिक व्यवहारांचा तपास, गुन्हेगारी नेटवर्कचा शोध आणि आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा