30 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरधर्म संस्कृतीआली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा....

आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा….

Google News Follow

Related

असं म्हणतात दर दहा मैलावर भाषा बदलते. अहो, भाषा बदलली म्हणजे आपसूक संस्कृतीही बदलतेच. संस्कृतीच्या बदलाच्या खाणाखुणा सण घेऊन येत असतात. म्हणूनच एकच सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. आज गौराईचे आगमन होणार त्यामुळे महिलावर्ग चांगलाच उत्साहात आहे. सणावर कोरोनाचे सावट असले तरी महिलांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. रविवार १२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटांनंतर गौराई आणण्याचा मुहूर्त होता. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ सप्टेंबर २०२१ रोजी गौरी पूजन केले जाणार आहे. गौरी पूजनाचा एकूण उत्सव तीन दिवस असतो.

गणपतीच्या बरोबरच गौरीचा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. गौरींना माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते. या दिवशी सर्व माहेरवाशिण एकत्र येऊन गौरीची पूजा अर्चा करतात. गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात.

हे ही वाचा:

आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत

रोनाल्डोचे दणक्यात पुनरागमन! युनायटेडने मारला गोल्सचा चौकार

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या वाढण्याची नितांत गरज

उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा