32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनिया... निर्दोष असूनही तो ४०० दिवस अडकला इराणमध्ये

… निर्दोष असूनही तो ४०० दिवस अडकला इराणमध्ये

Google News Follow

Related

मुंबईचा अनिकेत येनापुरे हा २०१९ मध्ये ‘आर्टीन १०’ या व्यापारी जहाजावरून इराणच्या बुशेर बंदरावर रवाना झाले होते. नंतर पुढील तपासात जहाजावर मॉर्फिन आढळल्याने अनिकेतसह इतर खलाशांना अटक करण्यात आली होती. खलाशांनी निर्दोष असल्याची अनेकदा विनवणी केली होती. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही आणि त्यांना ४०० हून अधिक दिवस चाबाहारच्या तुरुंगात काढावे लागले आणि दरम्यानच्या तपासात तेथील न्यायालयाने या सर्व खलाशांना निर्दोष मुक्त केले. परंतु अटकेवेळी सर्वांचा पासपोर्ट व आंतरराष्ट्रीय खलाशी म्हणून असलेला परवाना इराणच्या प्रशासनाने जप्त केला होता. तो परत मिळाला नसल्याने हे सर्व जण तेथेच अडकून पडले आहेत.

अनिकेतचे वडील शाम दूध घरोघरी पोहचवण्याचे काम करतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून मुलाच्या सुटकेसाठी मदत मागितली आहे. इराणमधील भारतीय दूतवासाकडून मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘आम्ही त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत. त्यांच्या सुटकेसाठी लागणारे पैसे देण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावरही आम्ही मार्ग शोधत आहोत,’ असे नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी ‘मुंबई मिरर’शी बोलताना सांगितले.

इराणमध्ये अडकलेले सर्व तरुण हे कनिष्ठ मध्यम वर्गातील आहेत. त्यांनी ‘आर्टीन १०’ या रझाई मुक्कादम या इराणी व्यक्तीच्या जहाजावर नोकरी मिळवण्यासाठी भरती एजंटला कर्ज काढून पैसे दिले आहेत. अनिकेत याची ही पहिली नोकरी होती. त्याला नोकरी मिळावी म्हणून कर्ज घेतले आणि स्वर्गीय पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत, असे शाम यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अनिकेत आणि त्याचे सहकारी फेब्रुवारी २०२० मध्ये जहाजावरून परत येणार होते. मात्र, दरम्यानच जहाजाचे कॅप्टन एम रसूल घरेबी यांनी त्यांच्या बदललेल्या मार्गाबद्दल कल्पना दिली. कॅप्टनने सांगितले की काही सिमेंटच्या गोणी जहाजात घेण्यासाठी ते ओमानला जात असून त्या गोणी उतरवण्यासाठी नंतर कुवेतला रवाना होतील. फेब्रुवारीमधील एका मध्यरात्री जेव्हा ते ओमानपासून १४० किलोमीटर दूर होते तेव्हाच कॅप्टनने त्यांना जहाजाला नांगर लावण्यास सांगितले. जहाजात काही गोणी ठेवल्या जात असल्याचे अनिकेतने पाहिले. मात्र, त्या तांदळाच्या गोण्या असल्याचे त्यांना सांगितले, असे शाम यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी इराणच्या नौदलाने त्यांच्या जहाजाला अडवून तपासणी केली आणि जहाजावरील सर्वांना अटक करण्यात आली. जहाजावरून १.५ टन मॉर्फिन जप्त करण्यात आले. कॅप्टनने त्याच्यासोबत असलेल्या भारतीय खलाशांचा काहीही दोष नसून त्यांना या सर्व प्रकरणाची काही कल्पना नसल्याची कबुली दिली, असे शाम यांनी सांगितले. मार्चमध्ये चाबाहारच्या न्यायालयाने अनिकेत व इतरांना निर्दोष मुक्त केले असल्याचे शाम यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा