31 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरक्राईमनामाआणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला...नराधम अटकेत

आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत

Related

मुंबई, पुणे, अमरावती, पिंपरी-चिंचवड, वसई अशा लागोपाठ एकामागून एक होणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी सध्या महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता उल्हासनगर येथून आणखीन एक बलात्काराचे प्रकरण पुढे आले आहे. अतिशय संतापजनक आणि चीड आणणार्‍या या घटनेत पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. हातोड्याचा धाक दाखवत एका नराधमाने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातच ही घटना घडली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्काय वॉकवर ही चौदा वर्षांची मुलगी उभी होती. शिर्डीवरून आपल्या आईला भेटून ती परत येत होती. अशावेळी एक तरुण तिच्या जवळ आला आणि तिच्यावर जबरदस्ती करून, हातोड्याचा धाक दाखवत एका निर्जन स्थळी तिला घेऊन गेला. या तरुणाने त्या मुलीवर बळाचा वापर करून तिला बेदम मारहाण केली. तर त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तो निघून गेला.

हे ही वाचा:
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपला तपास सुरू केला पोलिसांना आपल्या तपासात यश आले असून या प्रकरणातील आरोपी श्रीकांत गायकवाड उर्फ दादा गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या चौकशीत गायकवाड याने आपला गुन्हा कबुल केला आहे.

सध्या महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. तरीही राज्य सरकार कोणतीही ठोस पावले या विषयांमध्ये उचलताना दिसत नाहीये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा