26.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरधर्म संस्कृती१०८ वर्षांनी भारतात आली माता अन्नपूर्णेची ही मूर्ती

१०८ वर्षांनी भारतात आली माता अन्नपूर्णेची ही मूर्ती

Google News Follow

काशी विश्वनाथ धाम येथील अन्नपूर्णा मंदिरात १०८ वर्षांनंतर माता अन्नपूर्णाच्या दुर्मिळ मूर्तीचा सोमवारी जीर्णोद्धार करण्यात आला. सीएम योगींनी माता अन्नपूर्णाच्या भव्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी लोकांनी माता अन्नपूर्णेचा जयघोष केला. त्यानंतर सीएम योगींनी प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुरातत्व विभागाच्या टीमने काशी विद्वत परिषदेच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. पुतळा जीर्णोद्धार झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कशी विश्वेश्वराच्या देवळात हजरेटी लावली. जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक केल्यानंतर त्यांनी शंकराचे आशीर्वाद मागितले. जनकल्याणाच्या भावनेने शंकराचे पूजन करून तेथून निघाले. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मूर्ती स्थापनेचा प्रसाद वाटपही होणार असून, या ठिकाणी धार्मिक नेते आणि मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. बाबा विश्वनाथांच्या अंगणातही माता अन्नपूर्णेच्या आगमनाचा आनंद प्रत्येक कणात पसरलेला आहे.

बाबा विश्वनाथांच्या एकादशीच्या पालखीची चांदीची पालखी माता आणि सिंहासनाच्या स्वागतासाठी रवाना झाल्याची माहिती श्री काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ.तिवारी यांनी दिली. या पालखीत सिंहासनावर विराजमान झालेल्या ज्ञानवापीच्या प्रवेशद्वारातून त्यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये प्रवेश केला. ११ नोव्हेंबरला दिल्लीहून निघाल्यानंतर, काशीला पोहोचताना, अलिगढ, लखनौ, अयोध्या, जौनपूरसह उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्यांमधून मातेची मूर्ती प्रवास करून आली. सोमवारी दिल्लीहून आलेल्या काशी मातेच्या मूर्तीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, डमरू, टाळ, घंटा वाजवून मातेची आरती पार पडली.

हे ही वाचा:

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

माता अन्नपूर्णाची भव्य यात्रा काशीत काढण्यात आली. जिथे लोकांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रार्थना केली. माता अन्नपूर्णेची ही मूर्ती वाळूच्या दगडापासून बनलेली आहे. ही मूर्ती १८व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मूर्तीमध्ये आई अन्नपूर्णा एका हातात खीर आणि दुसऱ्या हातात चमचा धरते. ही दुर्मिळ मूर्ती कॅनडातून आणण्यात आली आहे. ज्या ऐतिहासिक वस्तू तस्करांनी चोरून विकल्या होत्या त्यातील एक ही मूर्ती आहे. जी कॅनडातील एका आर्ट गॅलरीत ठेवण्यात आली होती. जिथे भारतीय वंशाच्या कलाकाराने आपली ओळख आणि मुद्दा भारत सरकारसमोर मांडला. त्यानंतर ही मूर्ती भारतात आणण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा