28 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरराजकारण‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’

‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेत केवळ घोषणा केल्या आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

चार महिने झाले तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्तीबाबत अजूनही सरकारकडून काहीच हालचाल झालेली नाही. २०१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे अजूनही नियुक्ती मिळालेली नाही.

स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकर सारख्या होतकरू विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेंव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात केवळ घोषणाच केल्या. फक्त तोंडाची वाफ केली, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे वय वाढले या मुद्द्यावरून सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या केवळ पानं पुसली असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही, अशी टीका सरकारवर केली आहे. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा