28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरक्राईमनामानागपुरात नग्न नृत्याचा 'हंगामा डान्स'

नागपुरात नग्न नृत्याचा ‘हंगामा डान्स’

Google News Follow

बिभित्सपणाचा कळस गाठणारा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात अलीकडेच काही दिवसापासून बघायला मिळत आहे. रात्र होताच बंद शामियान्यात शेकडो तरुणाईच्या उपस्थितीत ‘ न्यूड (नग्न) डान्स ‘ असा किळसवाणा प्रकार सुरु असतो.

उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ अशी जाहिरातबाजीची पत्रके सगळीकडे लावण्यात आली आहेत. या पोस्टर मध्ये सिम्पल हंगामा, हॉट हंगामा, नो एन्ट्री हंगामा अश्या सूचनांसह पोस्टर लावण्यात आली आहेत.

कुही तालुक्यातील मुसळगाव, भूगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील बाम्हणी या ठिकाणी या डान्स शोचे आयोजन नुकतेच पार पडले. पहिल्या तीन गावांमध्ये या डान्स शोने काही प्रमाणात मर्यादा ओलांडल्या. बाम्हणी या ठिकाणी तर हद्दच पार केली या शोने. बाम्हणीमध्ये न्यूड डान्स शोने चांगलाच हंगामा केला. या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता नाचगाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. हळूहळू गर्दी वाढायला लागली. पाचशेहुन अधिक तरुण बंद शामियान्यात गोळा झाले. हिंदी गाण्याच्या तालावर तरुण थिरकायला लागले. क्षणभरातच मंचावर अक्षरशः विवस्त्र होत नाचायला सुरवात केली.

शेकडो तरुणांच्या गर्दीत बंद शामियान्यात हा प्रकार मागील काही दिवसापासून खेड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे. केवळ शंभर रुपयांमध्ये हा डान्स हंगामा बघण्यासाठी तरुणांची गर्दी उसळत आहे. अनेकांनी न्यूड डान्सचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले आहेत.

हे ही वाचा:

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

 

अंगावर केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेल्या दोन तरुणी आणि त्यांच्या सोबतीला अर्धनग्न कपडे घातलेले दोन तरुण मंचावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काही गावांमध्ये कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा