30 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरधर्म संस्कृती‘हिंदुत्व आणि सावरकर’ विषयावर सुनील देवधर मांडणार परखड विचार

‘हिंदुत्व आणि सावरकर’ विषयावर सुनील देवधर मांडणार परखड विचार

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी ‘बहुआयामी सावरकर’ कार्यक्रम

क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९ व्या जयंती निमित्त, येत्या शनिवारी, २८ मे रोजी अटल सेवा केंद्र, मुंबई तर्फे “बहुआयामी सावरकर” हा आगळा वेगळा सोहळा रात्रौ ८.३० वाजता मा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले(पूर्व) येथे आयोजिलेला असून त्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची’ निवडक लोकप्रिय गीते कथ्थक नृत्ये, नाट्यगीत गायन व शालेय विद्यार्थ्यांच्या समूह गीतगायनाद्वारे सादर करून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना’ स्वरसुमनांजली वाहिली जाणार आहे.  त्यानंतर प्रखर वक्ता सुनील देवधर (भाजपा राष्ट्रीय सचिव) यांचे ‘हिंदुत्व व सावरकर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

यासंदर्भात माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी माहिती दिली की, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सहा लोकप्रिय गीते या सोहळ्यात सादर केली जाणार आहेत. वीर सावरकरांनी लिहिलेली नाट्यपदे गायक गाणार आहेत. धनंजय म्हसकर, स्वाती आपटे ही गीते सादर करणार आहेत. तर त्यांची दोन गीते कथ्थकच्या स्वरूपात सादर केली जाणार आहेत. नुपूर नृत्य अकादमीच्या माध्यमातून हे नृत्य सादर केले जाणार आहे. वैशाली पोतदार यांच्या शिष्या हे नृत्य पेश करतील.

हे ही वाचा:

स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला

‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’

अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

मीठ म्हणून आणलेलं ५०० कोटींचे कोकेन जप्त

 

‘जयोस्तुते’ सारखे प्रखर राष्ट्रभक्तीपर गीत समूहगीताच्या स्वरूपात सादर केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही गीते सादर केली जातील.

गेली चार वर्षे आपण असे कार्यक्रम करत आहोत. सावरकरांच्या हस्तलिखितांची पार्ल्यात दिंडी काढली होती. दीनानाथमध्ये नाटकही घेतलं होतं. मिरजवरून एक कथ्थकचा ग्रुप आला होता. सावरकरांच्या जीवनावर कार्यक्रम त्या माध्यमातून करण्यात आला होता. मागच्या वर्षी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. कोविडमुळे ऑनलाइन कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार पूनम महाजन, विशेष उपस्थिती आमदार पराग अळवणी असतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा