29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामापंतप्रधान मोदींवरील हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला

पंतप्रधान मोदींवरील हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला

Google News Follow

बिहार पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला आहे. पाटण्यामधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या कटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचाही समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांचं १५ दिवसांचं प्रशिक्षण फुलवारी शरिफ येथे झालं. त्यांनी ६ आणि ७ जुलैला घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींवर १२ जुलैच्या दौऱ्यात हल्ला करण्याचा कट रचला. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली होती. आरोपींपैकी एकजण माजी पोलीस अधिकारी असल्याची समोर आली आहे.

या कटानुसार भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून काही कागदपत्रे मिळाली. यात ‘२०४७ पर्यंत भारत एक इस्लामिक राष्ट्र’ नावाचे कागदपत्र सापडले आहेत. याशिवाय २५ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (PFI) पॅम्प्लेटही हस्तगत करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

मध्य रेल्वेचे यात्री ऍप्लिकेशन प्रवाशांच्या सेवेत

विशेष म्हणजे, अटक केलेल्या आरोपींपैकी एकजण माजी पोलीस अधिकारी आहे. मोहम्मद जलालुद्दीन झारखंड पोलीस विभागातील माजी अधिकारी आहे. तर जलालुद्दीन याआधी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या कट्टरतावादी संघटनेशीही संबंध राहिला आहे. फुलवारी शरिफचे साहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, पीएफआयने कोणतीही पॅम्प्लेट प्रकाशित केले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हे आरोप फेटाळून लावले आहेत. फुलवारी शरिफ येथे भेट देणाऱ्या आणि दहशतवादी हल्ल्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथून असल्याचं समोर आलं आहे. तर अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तान, बांगलादेशव तुर्की सारख्या मुस्लीम देशांमधून पैसे मिळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा