29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषमध्य रेल्वेचे यात्री ऍप्लिकेशन प्रवाशांच्या सेवेत

मध्य रेल्वेचे यात्री ऍप्लिकेशन प्रवाशांच्या सेवेत

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी याच्या उपस्थितीत ‘यात्रा’ ऍपचे प्रात्यक्षिक पार पडले. या ऍप्लिकेशन मधून प्रवाशांना लोकल रेल्वेच्या थेट लोकेशनची महिती मिळू शकते. यासाठी सर्व लोकल मध्ये जीपीएस यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या ऍपची हार्बर मार्गावर चाचणी घेण्यात आली होती. या ऍपची सेवा मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईनवरील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

या ऍपचे खास वैशिट्य म्हणजे रिफ्रेश केल्या नंतर दर १५ सेकंदानंतर लोकल रेल्वेचे थेट अपडेट समजणार आहे. उपनगरीय रेल्वे व एक्सप्रेस गाड्याचे तिकीट भाडे, मेल एक्सप्रेस ट्रेनचे ठिकाण आणि पीएनआर स्थिती कळू शकणार आहे. स्थानकनिहाय सुविधा पाहणे, मदतीसाठी आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधने, मेट्रो- मोनो फेरी, बसची माहिती व वेळापत्रक पाहणे, रेल्वे आणि आपत्कालीन क्रमांक समाविष्ठ करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

यात्री ऍप हे दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी, रेल्वे धावण्याविषयीची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच ट्रेनच्या आगमन- प्रस्थानाबाबत वेळेवर सूचना मिळणार आहे. प्रवाशांच्या नियोजनासाठी उपयुक्त ऍप आहे. विशेष म्हणजे मेगाब्लॉक, रेल्वे सेवा विस्कळीत किंवा विशेष गाड्यांबद्दलची माहिती थेट मिळू शकेल,” अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लोहाटी यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा