28 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरक्राईमनामाश्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली

श्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली

मृतदेह पलंगामध्ये लपवून फरार झाला

Google News Follow

Related

दिल्लीत श्रद्धा वालकर प्रमाणेच निकिता यादव हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता पालघरमध्येही अशीच घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशिपमध्ये असलेल्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पलंगामध्ये लपवून ठेवला. मृतदेह लपवल्यानंतर तो फरार झाला. ही घटना नालासोपारा येथे घडली आहे.

गेल्या सोमवारी नालासोपारा येथील विजय नगर भागातील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आधी खोली शोधली पण मृतदेह सापडला नाही, मग पलंग शोधला. पलंग उघडताच महिलेचा दुर्गंधी येत असलेला मृतदेह आढळून आला. फ्लॅटमधून पीडित मेघा शहा (३७) हीचा  मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पालघर तुळींज पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तिचा लिव्ह इन पार्टनर हार्दिक याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी बेरोजगार असून त्यांच्यात अनेकदा भांडण होत असे. अशाच एका भांडणानंतर आरोपीला आपला राग आवरता आला नाही आणि रागाच्या भरात त्याने मैत्रिणी मेघाची हत्या केली आणि तिचा मृतदेह पलंगावर फेकून दिला. त्याने आपल्या बहिणीलाही हत्या करण्याआधी मेसेज पाठवला होता. पळून जाण्यापूर्वी फ्लॅटमधील फर्निचर विकले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

लगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

मेघा नर्स म्हणून काम करत होती आणि ती घरातील एकमेव कमावती होती, तर हार्दिक बेरोजगार होता. आर्थिक चणचणीमुले त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती, ज्याचे पर्यवसान तिच्या हत्येमध्ये झाले.हे जोडपे तीन वर्षांपासून डेट करत होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र राहत होते आणि काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले होते.

मध्यप्रदेशात केली धरपकड
आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला तुळींज पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला मध्य प्रदेशातील नागदा येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी गाडीमध्ये पकडले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा