26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरक्राईमनामाआधी गळा आवळून खून .. मग मृतदेह ७२ तास फ्रिजमध्ये ठेवला!

आधी गळा आवळून खून .. मग मृतदेह ७२ तास फ्रिजमध्ये ठेवला!

Google News Follow

Related

दिल्लीत पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकरण समोर आले आहे. आरोपी तरुणीचा मोबाईलच्या वायरने गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह ७२ तास फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. दक्षिण पश्चिम दिल्लीतील मित्राव गावाच्या बाहेरील फ्रीजमधून निक्की यादवचा मृतदेह सापडला आहे.

पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोतला अटक केली आहे. त्याच दिवशी त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचे सांगितले जात आहे. गेहलोत बऱ्याच काळापासून निक्कीसोबत राहत होता. त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते. निकीला हे समजल्यावर तिने विरोध करण्यास सुरुवात केली. ९ आणि १० फेब्रुवारीच्या रात्री दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर संतापलेल्या साहिलने कारमधील मोबाईल फोनच्या वायरने निकीचा गळा आवळून खून केला. यानंतर निकीचा मृतदेह मित्राव गावातील ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून त्याच दिवशी त्याने दुसरे लग्न केले. साहिल याच गावचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

साहिल आणि निकी दोघेही प्रेमात पडले आणि दोघे एकत्र राहत होते. निक्की ही झज्जरची रहिवासी होती. ती मेडिकलच्या परीक्षेची तयारी करत होती. दोघे अनेक ठिकाणी ठिकाणी फिरायला गेले होते . लॉकडाऊननंतर दोघेही भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. कुटुंबीयांना त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. घरच्यांच्या दबावाखाली साहिलने एका मुलीशी लग्न केले.

हे ही वाचा:

केअरटेकर म्हणता म्हणता जीवावर उठला! एकाचा मृत्यू

बीबीसीवरील छापे आणि बिळातून बाहेर आले विरोधक

सगळ्यांना हवीहवीशी वंदे भारत; मागणी वाढली

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

साहिल गेहलोतने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याचे लग्न नक्की झाल्यानंतर निकीने त्याला सांगितल की, आपण दोघे एकत्र राहू शकत नाही, पण एकत्र जीव देऊ शकतो. ९ फेब्रुवारीच्या रात्री या प्रकरणावरून दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. निक्की म्हणाली तुझ्याकडे तीन मार्ग आहेत. माझ्याशी लग्न कर, घरच्यांनी ठरवलेले लग्न मोडून टाक नाहीतर आपण दोघे एकत्र मरू. साहिल म्हणाला की तो या तिघांपैकी काहीही करू शकत नाही. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर साहिलने मोबाईलच्या वायरने निकीचा गळा आवळून खून केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा