34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषलगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

लगानची कॉमेंट्री झाली मूक .. जावेद खान यांनी घेतला जगाचा निरोप

फुफ्फुसाच्या समस्येमुळे आजारी होते

Google News Follow

Related

दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका ‘नुक्कड’ पासून ते ‘लगान’ आणि ‘चक दे इंडिया सारख्या चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते जावेद खान अमरोही निधन झाले आहे . ते ७० वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या समस्येमुळे ते काही दिवसांपासून आजारी होते. चित्रपट निर्माते रमेश तलवार यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अमरोही यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थिएटर आणि चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते अमरोही यांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले होते आणि ते गेल्या एक वर्षापासून अंथरुणाला खिळले होते. तलवार यांनी सांगितले की, मुंबईच्या उपनगरातील सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या ‘नुक्कड’ या मालिकेमध्ये जावेद खान यांची नाई करीमची भूमिका चांगलीच गाजली . त्यानंतर ‘अंदाज अपना अपना’मधील आनंद अकेला, ‘लगान’मधील क्रिकेट समालोचक आणि ‘चक दे इंडिया मधील जावेद खान यांची भूमिका सिने रसिकांच्या चांगलीच पसंतीस पडली.

हे ही वाचा:

केअरटेकर म्हणता म्हणता जीवावर उठला! एकाचा मृत्यू

बीबीसीवरील छापे आणि बिळातून बाहेर आले विरोधक

सगळ्यांना हवीहवीशी वंदे भारत; मागणी वाढली

महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

‘हम हैं राही प्यार के’, ‘लाडला’, ‘इश्क’ आणि १९८८ मधील टीव्ही मालिका ‘मिर्झा गालिब’ यांसारख्या ९० च्या दशकातील हिट चित्रपटांमधील अभिनयासाठी अमरोही यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच स्मरणात राहतील. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘सडक २’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी जवळपास १५० हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. जावेद त्याच्या कॉमेडीसाठीही ओळखला जात होता. ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटात त्याने एका हवालदाराची भूमिका साकारली होती, जी रसिकांच्या पसंतीस उतरली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा