30 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरक्राईमनामादीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

सुकेशच्या सेलवर अधिकाऱ्यांचा अचानक छापा

Google News Follow

Related

मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद असलेल्या गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड चैन सुरु आहे. सुकेशच्या सेलमध्ये चक्क ब्रँडेड चप्पल याशिवाय महागड्या जीन्सही आहेत. सुकेशच्या मंडोली कारागृहातील सेलवर अधिकाऱ्यांनी अचानक छापा मारला असता अधिकाऱ्यांना या वस्तू आढळून आल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झडतीमध्ये या एषोरामाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. छाप्यादरम्यान सुकेशच्या सेलमधून दीड लाख रुपयांच्या या ब्रँडेड चप्पलची किंमत दीड लाख रुपये तर दोन जीन्स ८० हजार रुपयांच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सेलचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.ज्यामध्ये सुकेश तिहारच्या मंडोली जेलमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुरुंग अधिकारी सुकेशच्या सेलची झडती घेत आहेत. कारागृहातील कर्मचारी सर्व गोष्टींची झडती दिसत आहेत. यादरम्यान तुरुंग अधिकारी सुकेशच्या सेलमध्ये पोहोचताच तो रडू लागला.

दरम्यान, ज्याने हा व्हिडिओ लीक केला आहे, त्याच्यावर लवकरच कडक कारवाई केली जाईल असे तुरुंग अधिकाऱ्याने म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी २०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला नुकतीच ईडीने अटक केली आहे. याआधी सुकेशला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते पण नंतर त्याची मंडोली तुरुंगात बदली करण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सुकेशला एका नवीन प्रकरणात अटक केली आहे. रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​माजी प्रवर्तक मालविंदर सिंग पत्नी आदिती सिंग यांची फसवणूक केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. अदिती सिंगची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर आहे.

हे ही वाचा:

भारत ते गयाना लवकरच थेट विमानसेवा

मुंबईत येथे होतोय साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल

नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार खाशाबा जाधव यांचा जीवनपट

निवडणूक आयोगाने शिंदे गटाबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देता येणार नाही!

सुकेश चंद्रशेखरचं नावही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेल आहे. ईडीच्या चौकशीत त्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मात्र, सुकेशच्या गुन्हेगारी कारवायांची आपल्याला माहिती नसल्याचे जॅकलिनने सांगितले होते. याशिवाय सुकेशचे नाव नोरा फतेहीसोबतही जोडले गेले होते. त्याने नोराला महागड्या भेटवस्तू दिल्याची माहिती दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा