29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरविशेषद केरळ स्टोरी' यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !

द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !

इंदिरा गांधींच्या काळातील जुन्या हिंदी चित्रपटांवर देखील बंदी घालण्यात आली होती.

Google News Follow

Related

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी मोठ्या वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झाला आहे.जेव्हापासून सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत होता.आता पर्यंत या चित्रपटाने ९४ कोटी कलेक्शन केले आहे. देशातच नाहीतर विदेशातही ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दणदणीत कमाई करताना दिसत आहे.

मात्र,प.बंगाल आणि तामिळनाडू राज्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.“द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी” या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे या राज्यांनी सांगितले. ही गोष्ट आहे ‘द केरळ स्टोरी’ ची, पण हिंदी चित्रपट जगतात असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यावर अनेक वर्षांपासून वाद थांबला नाही.

अनेक चित्रपटांच्या प्रिंट्स मुंबईतून आणल्यानंतर जाळल्याचा वाद असा रंगला, करोडोंचे नुकसान झाले.असे अनेक चित्रपट यादीत आहेत.या यादीतील पहिला चित्रपट दिग्दर्शन अमृता नाहाटा यांच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटात राज किरण, सुरेखा सिक्री, शबाना आझमी यांसारख्या स्टार कास्ट दिसल्या होत्या. हा चित्रपट १९७५ साली रिलीज होणार होता पण इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये त्यावेळी आणीबाणीचा काळ होता.त्यावेळी आणीबाणीच्या काळात कुठलाही चित्रपट प्रदर्शित व्हायचा, की सरकार ते आधी पाहायचे.या चित्रपटात मारुती कार प्रकल्पाबाबत दाखवण्यात आले होते.सरकारला वाटले हा चित्रपट आपल्या प्रोजेक्टची खिल्ली उडवत आहे.त्यावेळी मारुती कार हा संजय गांधींचा ड्रीम प्रोजेक्ट होता.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

अकोल्यात दोन गट एकमेकांना भिडले; एकाचा मृत्यू

बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

यासोबतच सरकारचे निवडणूक चिन्ह ‘जनता की कार’ असे होते.ज्याला चित्रपटात सार्वजनिक कार म्हटले होते. हे पाहून सरकारने या चित्रपटाच्या प्रिंट्स मुंबईहून आणून गुडगावच्या मारुती कारखान्यात जाळण्यात आले होते.या चित्रपटात मुख्य भूमिकेत राज बब्बर दिसण्यात आला होता.त्यांनतर १९७७ मध्ये आणीबाणी उठवण्यात आली आणि या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला.मात्र रिमेक चित्रपटात राज बब्बरने काम केले नाही. नंतर या चित्रपटात राज किरण, सुरेखा सिक्री आणि शबाना आझमी हे नवीन स्टार कास्ट म्हणून दिसले.

यादीतील दुसरा चित्रपट म्हणजे ‘आंधी’ हा चित्रपट १९७५ प्रदर्शित झाला मात्र काही दिवसांनी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.चित्रपट पाहिल्यानंतर काही लोकांना वाटले की इंदिरा गांधींना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.चित्रपटात धूम्रपान आणि मद्यपानाचे दृश्य होते, ज्यावर अनेकांनी आक्षेप घेतला त्यामुळे बराच वादही झाला होता.आणीबाणीच्या काळ असल्याने हे चित्रपट सरकार शिवाय कोणालाच दिसत न्हवते.या चित्रपटाचे जे वादग्रस्त दृश्य होते ते सीन पुन्हा शूट करण्यास चित्रपट दिग्दर्शक गुलजार याना सांगण्यात आले होते.हि बंदी १९७७ पर्यंत कायम होती.त्यानंतर सरकार बदलल्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

हा चित्रपट सुत्रिता सेनचा शेवटचा हिंदी चित्रपट होता असे म्हटले जाते. शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. तो एक क्रांतिकारी चित्रपट होता. या चित्रपटात सीमा बिस्वास, निर्मल पांडे हे स्टारकास्ट राहिले होते.हा चित्रपट फुलन देवीचा बायोपिक होता. चित्रपटात महिलांवरील लैंगिक हिंसाचाराचा मार्ग फुलन देवीला आवडला नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर खुद्द फुलन देवीनेच यावर प्रश्न उपस्थित केला होता. बंदी घातली नाही तर थिएटरबाहेर आत्महत्या करेन असंही तिनं म्हटलं होतं. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भारताकडूनही तो ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.

नंदिता दासचा पहिला चित्रपट ‘फिराक’ २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. गुजरात दंगलीवर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गुजरातमध्ये बंदी घालण्यात आली होती.या चित्रपटासाठी वितरक मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंदिता यासाठी नकार देत आहे. बर्‍याच संघर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला.हुसैन झैदी यांच्या ‘ब्लॅक फ्रायडे: द ट्रू स्टोरी’ या पुस्तकावर आधारित दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ हा चित्रपट २००४ मध्ये लोकार्नो फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. जेव्हा भारताने हा पहिला तेव्हा सेन्सर बोर्डाने त्यावर दोन वर्षाची बंदी घातली.हा चित्रपट १९९३ साध्य मुंबई बॉम्बस्फोटाच्या सत्यकथेवर आधारित असल्याचे बोलले जाते .त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्य्त आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा