उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा पार पडला यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज इथल्या महाकुंभ पाठोपाठ २०२६-२७ ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्ताने अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकासकामाची आणि निधीची केलेली तरतूद याबद्दल सादर केले.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘नमामि गोदावारी’ अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असं अजित पवार म्हणाले. नाशिक येथे रामकालपथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाकाठ परिसरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी १४० कोटी १० लाख रुपयांची कामे खाती घेण्यात येत आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महानुभव पंथाच्या श्रध्दास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे भव्य स्मारक
स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. याठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे.
हे ही वाचा..
मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करणार
श्रीजेश, सविता, हरमनप्रीत यांचे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कारांसाठी नामांकन
सीता मातेचे मंदिर बांधण्याची क्षमता मोदी सरकारमध्येच
विरोधी पक्ष नेत्यासह विरोधी खासदारांसाठी रिफ्रेश कोर्सची गरज
आग्रा येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग असून छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. पुढील पिढ्यांना छत्रपती शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे अजित पवारांनी जाहीर केले.