30 C
Mumbai
Saturday, September 17, 2022
घरअर्थजगतअंबुजा सिमेंटला अदानींची मजबूती

अंबुजा सिमेंटला अदानींची मजबूती

अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड कंपनी ताब्यात घेण्याच्या अधिग्रहणाची प्रक्रिया केली पूर्ण

Related

अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड कंपनी ताब्यात घेण्याच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या अधिग्रहणानंतर अदानी देशातील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे.अदानीने आपल्या व एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीमार्फत होल्सिम या स्वित्झर्लंडच्या कंपनीबराेबरचा व्यवहार पूर्ण केला. खुली ऑफर दिल्यानंतर हे अधिग्रहण पूर्ण झाले असल्याचं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे

सिमेंट उद्याेगातील या दाेन्ही दिग्गज कंपन्या सुमारे १०.५ अब्ज डाॅलरला विकत घेतल्याची माहिती आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर, अदानीचे अंबुजा सिमेंट्समध्ये ६३.१५ टक्के आणि एसीसीमध्ये ५६.६९ टक्के (अंबुजा सिमेंटद्वारे ५०.०५ टक्के भांडवली हिस्सा) भांडवली हिस्सा असेल. अंबुजा सिमेंट्स आणि एसीस चे एकत्रित बाजार भांडवल १९अब्ज डाॅलर आहे.

गौतम अदानी यांनी त्यांचा ३५ वर्षांचा मोठा मुलगा करण अदानी याच्याकडे या व्यवसाय सोपवल्याचं वृत्त आहे. करण अदानी यांच्यावर सिमेंटचा व्यवसाय सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे. गेल्या दीड दशकापासून करण अदानी सुमारे १५,९३४ कोटी रुपयांचा बंदर व्यवसाय जबाबदारीने हाताळत आहे.करणने अमेरिकेच्या  पुद्र्यू युनिव्हर्सिटी, यूएसए मधून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी घेतली आहे.जानेवारी २०१६ मध्ये करणची अदानी यांची पोर्टचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्याने व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला.

हे ही वाचा:

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

‘जॉन्सन बेबी पावडर’चा उत्पादन परवाना कायमचा रद्द

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना एसीबीकडून अटक

अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी या दोन्ही कंपन्यांना अदानी इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्मसोबतच्या समन्वयातून लक्षणीय फायदा होणार असल्याचं म्हटल्या जात आहे. कारण अदानी समूहाचे कच्चा माल, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि लॉजिस्टिक या क्षेत्रांमध्ये भक्कम स्थान आहे. हे अदानी समुहाचा हाता आतापर्यंतचे सर्वात मोठा अधिग्रहण व्यवहार असल्याचं म्हटल्या जात आहे.

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नॉल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली आहे, असे फोर्ब्सने  प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत ते आता टेस्लाचे सह-संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,943चाहतेआवड दर्शवा
1,935अनुयायीअनुकरण करा
35,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा