29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरबिजनेसचार वर्षांनी रशियाचे डिझेल निघाले अमेरिकेला

चार वर्षांनी रशियाचे डिझेल निघाले अमेरिकेला

जहाज ७ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये पोहोचण्याची शक्यता

Google News Follow

रशिया आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या करारानंतर रशियन डिझेलचा पहिला टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला आहे. माल्टा ध्वजांकित ‘अगिओई फॅनेंडेस’ या टँकरमधून सुमारे ४० हजार मेट्रिक टन अल्ट्रा-लो सल्फर डिझेलची वाहतूक केली जात आहे. जहाज ७ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. ही खेप अमेरिकेत पोहोचल्यास, २०२२ मध्ये रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध लागू झाल्यानंतरची ही पहिली आयात ठरेल.

रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतासारख्या देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांनी स्वतःच्या देशातील इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याच रशियाकडून डिझेल मागवले. ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी अमेरिकेचे आर्थिक हित महत्त्वाचे ठरले; मात्र भारताने ऊर्जा गरजा भागवण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी केल्यास त्यावर आक्षेप घेतला जात होता. ट्रम्प यांच्या या भूमिकेतून त्यांच्या धोरणातील विरोधाभास आणि निवडक न्याय स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच आता पहिले जहाज अमेरिकेकडे रवाना झाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ ऑक्टोबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या कराराची घोषणा केली होती. त्यानुसार, रशिया अमेरिकेसह जागतिक बाजारपेठांना डिझेलचा पुरवठा करणार आहे. अमेरिकेत वाढत असलेल्या डिझेलच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग मानला जात आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका ३ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

हे ही वाचा:

वरळीतील उंच इमारतीमुळे सुरक्षेचा प्रश्न; केंद्र सरकार न्यायालयात

‘जैश’शी संबंधित मजकूर प्रसारित केल्याबद्दल रॅपिडो रायडरला महिममध्ये अटक

हरियाणातील गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटकेत

चीनच्या बदलत्या गस्तीमुळे सीमावर्ती भागांत तणाव

या करारानुसार, सुरुवातीला ३ लाख मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा करण्याची योजना आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी ५ लाख टन आणि पुढे १० लाख टन डिझेल पुरवण्याचे नियोजन आहे. हा पुरवठा सुलभ करण्यासाठी अमेरिकेने रशियन डिझेलसंदर्भातील काही निर्बंधही शिथिल केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा