30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरअर्थजगत‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?

‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?

निर्मला सीतारमण यांनी मांडला अर्थसंकल्प

Google News Follow

Related

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरुण, शेतकरी, महिला, करदाते अशा सर्वच वर्गांना दिलासा देण्यात आला आहे. रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीही अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार किंवा महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

निर्मला सीतारमण यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे. कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

काय होणार स्वस्त?

  • मोबाईल फोन आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) १५ टक्क्यांनी कमी झाल्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर्स स्वस्त होणार
  • सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्यात आले असून प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात ६.४ टक्के घट करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे सोन्याचे भाव घसरले आहेत.
  • सोलार पॅनेलची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना सीमाशुल्कातून सूट देण्यात येणार असून यामुळे सोलार पॅनेलच्या किंमती घटणार आहेत
  • फोन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियन-आयॉन बॅटरीवरील कर कमी करण्याची घोषणा
  • कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट
  • ई-कॉमर्सवरील टीडीएस रेट १ टक्क्यावरून ०.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा
  • फेरॉनिकेल, ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा
  • चामड्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार
  • २५ महत्त्वाची खनिजे सीमाशुल्कातून वगळण्यात आली आहेत
  • माशांपासून तयार केलेल्या खाद्यावरील सीमाशुल्क ५ टक्क्यांनी कमी केलं आहे

हे ही वाचा:

बजेट २०२४; देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि विश्वास पूर्ण करण्याच्या संकल्पाचे प्रतिबिंब !

५ वर्षात टॉप ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना मिळणार इंटर्नशिप !

स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार, ३ लाख उत्पन्नापर्यंत कर नाही

भारताला समृद्ध करणारे ‘बजेट’

काय होणार महाग?

  • नॉन-बायोडिग्रेबल प्लास्टिकच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अमोनियम नायट्रेटवरील सीमाशुल्क १० टक्क्यांवरून २५ टक्के
  • विशिष्ट दूरसंचार उपकरणांवरील प्राथमिक सीमाशुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आलं आहे
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा