भारतीय संसदेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांनी भारतीय बँकांची तब्बल ५८ हजार कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. या रकमे मध्ये कर्जाची मूळ रक्कम आणि साचलेल्या व्याजाचा समावेश आहे.
संसदेत सांगण्यात आले की जप्ती आणि लिलावाद्वारे बँकांनी आतापर्यंत १९१८७ कोटी रुपये वसूल केले आहेत.
फरार आर्थिक गुन्हेगार आणि त्यांचे थकबाकी
एकूण ५३ आर्थिक गुन्ह्यांमध्ये भारताच्या बँकिंग व्यवस्था मोठ्या प्रमाणात फसवली गेली आहे. यामध्ये प्रमुख नावे म्हणजे:
विजय माल्या – २२०६५ कोटी रु. थकबाकी; आतापर्यंत १४ हजार कोटी रु. वसूल
नीरव मोदी – 9,656 कोटी रु. थकबाकी; 545 कोटी रु. वसूल
तसेच सांडेसरा बंधू आणि इतर
या सर्वांनी मिळून ५८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम भारतीय बँकिंग व्यवस्थेतून बेकायदेशीरपणे काढून घेतली आहे.
हे ही वाचा:
“बाबरच्या नावाने भारतात कोणतीही मशीद बांधली जाणार नाही”
हिवाळी अधिवेशन: पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडली ‘ही’ दोन विधेयके
जपानमध्ये मुस्लिमांच्या कबरींना विरोध, स्वदेशात जाऊन दफन करा!
दिल्ली स्फोट: आरोपी डॉ. शाहीनच्या घरी एनआयएची छापेमारी
दोन फरार गुन्हेगारांनी केली थकबाकी भरपाई
फरार आर्थिक गुन्हेगारांच्या १५ जणांच्या यादीतील नितीन सांडेसरा आणि चेतन सांडेसरा यांनी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज पूर्णपणे फेडले आहे.
स्टर्लिंग ग्लोबल रिसोर्सेस प्रा. लि. आणि स्टर्लिंग SEZ अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे प्रमोटर असलेल्या या बंधूंनी इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक या दोन बँकांना मिळून ४९६ कोटी रुपये परत केले, असे सरकारने सांगितले. तरीही दोघेही फरार आर्थिक गुन्हेगार म्हणूनच घोषित असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सरकारचे पुढील प्रयत्न
सरकारने सांगितले की, आर्थिक घोटाळे करून फरार झालेल्यांबाबतचा कायदा आणि मनी लॉनडरिंग अंतर्गत मालमत्ता जप्त करणे, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू ठेवणे आणि जास्तीत जास्त वसुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.







