25 C
Mumbai
Friday, March 24, 2023
घरअर्थजगत5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

Google News Follow

Related

देशभरात ५ जी सेवेचा वेगाने विस्तार होत आहे. ३१ मार्चपर्यंत देशभरातल्या २०० शहरांमध्ये ५जी सेवा पोहचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. पण आता केंद्र सरकारने ६ जी सेवेसाठी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. ६ जी सेवेसाठी देशातील शास्त्रज्ञ आणि अभियंते तसेच शिक्षणतज्ज्ञांनी आतापर्यंत १०० पेटंट मिळवण्यात यश मिळवले आहे. केंद्रीय माहिती आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र खूपच गुंतागुंतीचे आहे. पण तरीही शास्त्रज्ञ आणि अभियंते तसेच शिक्षणतज्ज्ञांनी आतापर्यंत शंभर ६ जीचे पेटंट प्राप्त केले आहेत. ३१ मार्च २०२३ पर्यंत देशाला जवळपास १०० ६जी पेटंट मिळतील. २०० शहरांपर्यंत ५जी सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट होते. पण ५ जी नेटवर्क जवळपास ३९७ शहरांपर्यंत पोहोचले आहे.

भारत सध्या ५जी तंत्रज्ञानामध्ये सर्वोच्च आणि वेगवान झेप घेत आहे. भारतात २०३० च्या आसपास ६जी सेवा सुरू होऊ शकते, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६जी सेवेसाठी एक टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या टास्कफोर्सने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे.

हे ही वाचा:

एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत

अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित

खलिस्तानचा खरा शत्रू भारत नसून पाकिस्तान!

मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश

सध्याच्या घडीला दक्षिण कोरिया ६जी तंत्रज्ञानाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया २०२८ पर्यंत ६ तंत्रज्ञान लाँच करू शकते. ५जी च्या तुलनेत ६ जी मध्ये १०० पट जास्त वेग मिळतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,881चाहतेआवड दर्शवा
2,033अनुयायीअनुकरण करा
65,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा