26 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरअर्थजगतअदानी समुहाने म्हटले 'हा तर भारतावरचा हल्ला'

अदानी समुहाने म्हटले ‘हा तर भारतावरचा हल्ला’

अदानी समूहाकडून ४१३ पाणी अहवाल सादर

Google News Follow

Related

हिंडेनबर्गच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत अदानी समूहाने काल रविवारी आपले स्पष्टीकरण दिले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ज्यांचा गौरव होतो ते गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील समूहाने हिंडेनबर्गच्या आरोपांवर ४१३ पानांचा एक अहवाल देऊन त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. हिंडेनबर्गचे आरोप म्हणजे हा ‘भारत देशावरील हल्ला असून हा अहवाल म्हणजे अमेरिकास्थित कंपन्यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी तयार केला आहे.”  असे त्यांनी त्यात म्हटले आहे. पुढे २४ जानेवारी रोजी ‘मॅडऑफ्स ऑफ मॅनहॅटन’ वरील हिंडेनबर्ग संशोधन अहवाल वाचून धक्का बसल्याचे या समूहाने म्हटले आहे. हा अहवाल खोटा असून यामध्ये विशिष्ट हेतूने आमच्या समूहाची बदनामी करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचे अदानी समूहाने यात म्हटले आहे.

हे ही वाचा:

पद्म पुरस्कारांचा दाखला देत मोदींनी केले आदिवासी समाजाचे कौतुक

शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी

पवारांच्या भाकितांचे रहस्य काय?

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणतात, मी हिंदूच!

आर्थिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने हिंडेनबर्गने हे कृत्य केल्याचे अदानी समुहाने म्हटले असून हिंडेनबर्गच्या विश्वासार्हतेवरही अदानी समुहाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतात नवा आयपीओ येण्यापूर्वी वाईट हेतूने हिंडेनबर्गने हा अहवाल तयार केला आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी हिंडेनबर्गने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे शिवाय तो सादर करताना त्यांनी शेअर्स आणि परकीय चलनासंदर्भातील नियमांचा भंगही केला आहे. हा अहवाल नीट संशोधन करूनही बनवलेला नाही किंवा तो स्वतंत्रपणे बनवलेला नाही. त्याच्यापाठी कोणता उद्देशही दिसत नाही.

हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे याच अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स पडल्यामुळे शेअर बाजार घसरला होता.

या अहवालामुळे आपला शेअर बाजार कोसळून आणि देशभरात सुद्धा मागील आठवड्यात बऱ्याच आर्थिक घडामोडी घडल्या. बुधवारी समोर आलेल्या या अहवालात अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉकची हेराफेरी आणि खात्यातील फसवणुक करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे बुधवार आणि शुक्रवारी अदानी समूहाचे शेअर्स  खाली आले. दुसरीकडे, आज आठवड्याच्या सकाळच्या सत्रात समूहाच्या शेअर्समध्ये संमिश्र कल आपल्याला बघायला मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा