25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाहजारो कोटींची चूक

हजारो कोटींची चूक

Google News Follow

Related

एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने (इडी) बुधवारी येस बँकेचे माजी अध्यक्ष आणि सह-संस्थापक राणा कपूर यांना प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली आहे. ही अटक त्यांना त्यांच्या कार्यकाळात सध्या तुरूंगात असलेले एचडीआयएलचे प्रचारक राकेश आणि सारंग वाधवान यांच्या मॅक स्टार मार्केटिंग प्रा. या कंपनीला दोनशे कोटी रुपयांचे कर्ज दिल्याच्या आरोपाखाली करण्यात आली आहे. वधवान यांना पंजाब ऍंड महाराष्ट्र (पी ऍंड एम) बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

इडीने दिलेल्या माहिती नुसार दोनशे कोटी रुपयांचे लोन हे गर्तेत बुडालेल्या एचडीआयएलला तारण्यासाठी देण्यात आले. या कर्जातून एचडीआयएलने येस बँकेकडची आपली थकबाकी पूर्ण केली. याच्या विरोधात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय)ने मागील वर्षी एफआयआर दाखल केली होती. इडीने पैशाची अफरातफर करून गैरमार्गाने एचडीआयएलला तारण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका राणा यांच्यावर ठेवला आहे. जेणेकरून एचडीआयएल अनुत्पादक कर्ज म्हणून गणली गेली नसती.

इडीच्याच माहितीनुसार सगळे पैसे येस बँकेतच फिरवण्यात आला. येस बँकेने मॅक स्टारच्या आपल्या खात्यात कर्जाचे रक्कम जमा केली जी त्यानंतर एचडीआयएलच्या येस बँकेच्या खात्यात वळवण्यात आली. त्याच दिवशी एचडीआयएलने ही रक्कम येस बँकेवरील आपली देणी चुकवण्यासाठी वापरली.

मागील वर्षी अनेक कंपन्यांना चुकीच्या मार्गाने कर्ज वाटप केल्याबद्दल राणा यांना अटक करण्यात आली होती. यात डीएचएफएल, कॉक्स ऍंड किंग सारख्या कंपन्या आहेत ज्यांनी बँकेची देणी थकवली. याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने कपूर यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.

ओमकार ग्रुपलाही इडीचा दणका

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बावीस हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी ओमकार समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यपस्थापकीय संचालक बाबू लाल वर्मा यांना इडीने अटक केली आहे. ओमकार समुहाने देखील गैरमार्गाने विविध बँकांकडून झोपु योजनेसाठी कर्ज घेतले होते. यापैकीच एक बँक येस बँक होती. या बँकेकडून या समुहाने साडे चारशे कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. इडीने सोमवारपासून चालू केलेल्या विविध ठिकाणच्या धाडींत या संबंधीची कागदपत्रे सापडली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा