30 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरबिजनेसपावसाच्या लहरीपणामुळे ऑगस्टमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीत मोठी झेप

पावसाच्या लहरीपणामुळे ऑगस्टमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीत मोठी झेप

पेट्रोल विक्रीत ९.१ टक्के, तर डिझेल विक्रीत १०.२ टक्के वाढ

Google News Follow

Related

अनियमित आणि उशिरा झालेल्या मान्सूनचा थेट परिणाम देशातील इंधनाच्या मागणीवर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये पेट्रोलची विक्री वार्षिक आधारावर ९.१ टक्क्यांनी वाढून ३४.८ लाख टनांवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात ३१.९ लाख टन पेट्रोलची विक्री झाली होती. जुलैमध्येही पेट्रोलच्या विक्रीत ९.७ टक्के वाढ झाली होती. ऑगस्टमधील विक्री २०२४ च्या तुलनेत १४ टक्के आणि २०२३ च्या तुलनेत ३०.७ टक्के अधिक आहे.
हे ही वाचा:
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

ऑगस्टमध्ये १.९९ लाख कोटींचा विक्रमी जीएसटी महसूल जमा

लाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी पैसे दिल्याचे भासवून ३० लाख लुबाडले

भारताची चालू खात्यावरील तूट ४.२ अब्ज डॉलरवर

डिझेलच्या मागणीतही सलग दुसऱ्या महिन्यात दहाअंकी वाढ झाली. ऑगस्टमध्ये डिझेलची विक्री १०.२ टक्क्यांनी वाढून ६२.७ लाख टनांवर पोहोचली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५६.९ लाख टन डिझेल विकले गेले होते. जुलैमध्ये डिझेल विक्रीत १०.७ टक्के वाढ झाली होती. डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर मालवाहतूक, शेतीची यंत्रसामग्री आणि सिंचनासाठी केला जातो. यंदा अनेक भागांत पाऊस उशिरा आणि अनियमित झाल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी डिझेलवर चालणारे पंप अधिक वेळ चालवावे लागले. त्यामुळे डिझेलची मागणी वाढली.

मात्र, महिन्याच्या तुलनेत डिझेल विक्रीत १२ टक्क्यांची घट झाली. जुलैमध्ये ७१.३ लाख टनांची विक्री झाली होती. दुसरीकडे विमान इंधन अर्थात एटीएफच्या विक्रीत ५.६ टक्के वाढ होऊन ती ६.७७ लाख टनांवर पोहोचली. मात्र एलपीजीच्या विक्रीत १६.१ टक्क्यांची घट झाली असून ऑगस्टमध्ये २४.२ लाख टन एलपीजीची विक्री झाली. काही औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहक एलपीजीऐवजी पाइप्ड नॅचरल गॅसकडे वळल्याने एलपीजीच्या मागणीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा