28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरक्राईमनामालाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी पैसे दिल्याचे भासवून ३० लाख लुबाडले

लाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी पैसे दिल्याचे भासवून ३० लाख लुबाडले

एनआयए अधिकारी बनून वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट

Google News Follow

Related

राजधानी दिल्लीत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवादविरोधी पथकातील (ATS) अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या सायबर ठगांनी ७४ वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीला तब्बल सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले. लाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी निधी पुरवल्याचा आरोप करत ठगांनी या दाम्पत्याची ३० लाख रुपयांची फसवणूक केली.

ही घटना गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी घडली. द्वारका येथे राहणारा वृद्ध नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याच्या तयारीत असताना त्याला फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एनआयए अधिकारी म्हणून करून दिली आणि त्याच्या बँक खात्याचा वापर लाल किल्ला स्फोटातील आरोपींना निधी देण्यासाठी झाल्याचा दावा केला. १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ कार स्फोट झाल्याच्या काही दिवसांनंतर हा फोन आल्याने दाम्पत्य घाबरले.

दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलवर एका व्यक्तीने एनआयए, तर दुसऱ्याने एटीएस अधिकारी असल्याचे सांगितले. बँक खाते स्फोटातील आरोपी उमर नबी आणि इतरांशी संबंधित असल्याचा दावा करत त्यांनी दाम्पत्याला सात दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. कोणाशीही संपर्क साधू नका, मुलांनाही माहिती देऊ नका, अशी धमकी देण्यात आली. बनावट ‘कॉन्फिडेन्शियलिटी एग्रीमेंट’ पाठवून स्वाक्षरी घेतल्यानंतर बँक खाती, फिक्स्ड डिपॉझिट आणि मालमत्तेची माहिती मागवण्यात आली.

तपासाच्या नावाखाली ‘RBI-अधिकृत’ खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. ३ डिसेंबरला वृद्धाने FD मोडून ३० लाख रुपये काढले आणि दोन टप्प्यांत प्रत्येकी १५ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर बनावट RBI ‘व्हेरिफिकेशन लेटर’ही पाठवण्यात आले.

हे ही वाचा:

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

मध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

तामिळनाडूतील ५२ मंदिरांमध्ये स्मार्टफोनला बंदी

५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना

ठगांनी संपर्क तोडल्यानंतर फसवणूक उघडकीस आली. क्राइम ब्रँचने तपास सुरू केला. सुमारे सहा महिन्यांच्या तपासानंतर पैशांचा माग हरियाणातील फतेहाबाद येथील सुनील सिंगला याच्या ‘श्री बालाजी ट्रॅक्टर’ खात्यापर्यंत पोहोचला. या खात्यातून सहाहून अधिक सायबर फसवणूक प्रकरणांत जवळपास १ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. सिंगला याला ११ मे रोजी अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दाम्पत्याच्या १५ लाखांच्या एका व्यवहाराचा पुढील प्रवाह रोखत त्यातील १२ लाख रुपये परत मिळवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा