36 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामा१५ वर्षे पोलिसांना चकवा, अखेर ज्वेलरी फसवणुकीतील दोन भावांना बेड्या

१५ वर्षे पोलिसांना चकवा, अखेर ज्वेलरी फसवणुकीतील दोन भावांना बेड्या

१,४३० ग्रॅम सोने आणि ५६० कॅरेट हिरे घेऊन झाले होते फरार

Google News Follow

Related

दिल्लीतील तब्बल १५ वर्षे जुन्या ज्वेलरी फसवणूक प्रकरणाचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. दिल्ली क्राइम ब्रँचने या प्रकरणातील दोन सख्ख्या भावांना पश्चिम बंगालमधील हुगळी येथून अटक केली आहे. पिंटू कोले (४७) आणि मिंटू कोले (४६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून, ते व्यवसायाने ज्वेलरी मेकर आणि डिझायनर आहेत. तब्बल १५ वर्षे पोलिसांना चकवा देत हे दोघे हुगळीमध्ये नाव बदलून आणि लो-प्रोफाइल पद्धतीने राहत होते. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात २००९ मध्ये झाली. दोन्ही भावांनी आधी पश्चिम बंगालमध्ये दागिने बनवण्याचे आणि डिझाइनिंगचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर ते कामाच्या शोधात दिल्लीला आले. दिल्लीतील एका मोठ्या ज्वेलर्सकडे काम करताना त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मालकाचा विश्वास संपादन केला. मात्र, विश्वास मिळवल्यानंतर त्यांनी संधी साधत मोठी चोरी केली. आरोपानुसार, दोघांनी तब्बल १,४३० ग्रॅम सोने आणि सुमारे ५६० कॅरेट हिरे घेऊन ज्वेलरी दुकानातून पलायन केले. या घटनेनंतर ते थेट पश्चिम बंगालला परतले आणि त्यानंतर दिल्लीकडे फिरकलेच नाहीत.
हे ही वाचा:
दक्षिण मुंबईत ठाकरे बंधूंचा १ किमीचा लाँगमार्च

केरळमधून सौदी आणि बहरीनला थेट विमानसेवा

हा गर्जना मोर्चा नव्हे तर फक्त कोल्हेकुई

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
या प्रकरणात २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांचा शोध दीर्घकाळ सुरू राहिला. अखेर २०१२ मध्ये पोलिसांनी दोघांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. न्यायालयानेही त्यांना फरार घोषित करून पोलिसांना त्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात दोन्ही भावांनी हुगळीमध्येच आपले आयुष्य पुन्हा सुरू केले. फरारी असतानाही त्यांनी दागिने बनवण्याचे काम सुरू ठेवले आणि कोलकाता तसेच हुगळी परिसरातील ज्वेलर्ससाठी ज्वेलरी तयार करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, दिल्ली क्राइम ब्रँचला दोन्ही आरोपी हुगळीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. स्थानिक पातळीवर पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांचा ठावठिकाणा निश्चित केला आणि अखेर त्यांना अटक केली. १५ वर्षे पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यात यशस्वी झालेल्या या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे जुन्या प्रकरणांच्या तपासातही पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा