33 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरराजकारणदक्षिण मुंबईत ठाकरे बंधूंचा १ किमीचा लाँगमार्च

दक्षिण मुंबईत ठाकरे बंधूंचा १ किमीचा लाँगमार्च

ज्ञानेशकुमारांविरोधात केले होते मोर्चाचे आयोजन

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशा आयोजित केलेल्या ‘गर्जना’ मोर्चात नेहमीचीच ओरड ऐकायला मिळाली. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा अवघ्या १ किलोमीटरचा आणि १५ ते २० मिनिटांत चालून पूर्ण होणाऱ्या मार्गावर हा मोर्चा निघाला. वोटचोरी, ईव्हीएमवर बंदी, बॅलट पेपरवर निवडणुका, निवडणूक आयोगाची सरकारशी हातमिळवणी हे नेहमीचे आरोप गर्जना मोर्चा म्हणून संबोधित केलेल्या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधूंनी केले.

याआधी या मोर्चाचा मार्ग भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रूडास कंपनीपासून मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत निघणार होता. मात्र नंतर तो मार्ग बदलण्यात आला. आधीचा मार्ग हा जवळपास ४ किलोमीटरचा होता.

या आंदोलनाची घोषणा काही दिवसांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ ही रॅली थांबली आणि तिथेच त्याचे सभेत रूपांतर झाले.

हे ही वाचा:

केरळमधून सौदी आणि बहरीनला थेट विमानसेवा

जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ ऑक्टोबरअखेर येण्याची शक्यता

शेतात राबणार रोबोट्स, ड्रोन

रशियन तेलाच्या आयातीवर भारत ठाम

ईव्हीएम नको, बॅलट पेपर हवा

राज ठाकरेंनी या सभेत दोन मागण्या केल्या त्या म्हणजे महाराष्ट्रात राबवण्यात आलेली एसआयआर योजना रद्द करण्यात यावी तसेच यापुढे महाराष्ट्रात ईव्हीएमद्वारे नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात.

२०१८पासून सांगत आलो निवडणुकीत चोरी सुरू आहे. मतदारयाद्या, मशिन यात घोळ सुरू आहे. याविरोधात पाऊल उचललं पाहिजे. निवडणुकीवर बहिष्कार टाकायला सांगत होतो. त्याशिवाय दूध का दूध पानी का पानी होणार नाही.

अशा प्रकारे भाजपाची मतं वाढू शकत नाहीत आमची मतं कमी होऊ शकत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट भाजपाने ताब्यात घेतले आहेत. निवडणूक आयोग ताब्यात घेतला आहे, मीडिया ताब्यात घेतला आहे. बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, एसआयआरमधून २ कोटी लोकं बाहेर काढलीत हे कोण आहेत आमचे मतदार आहेत की ते कोण आहेत. माझी विनंती आहे पक्षांना एसआयआर रद्द झाला पाहिजे. दुसरं म्हणजे वोटिंग मशिन बंद होऊ बॅलट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात.

हा स्वातंत्र्याचा लढा

उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांच्या भाषणानंतर सर्वात शेवटी भाषण केले. ते म्हणाले की, हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. पहिल्याप्रथम मोदी पंतप्रधान झाले. मेक इन इंडिया ही घोषणा दिली. आपल्या देशात हुकुमशहा बनणार असेल तर त्याला गाडणार आहोत. अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याबद्दल शेलकी भाषा वापरली. ते म्हणाले, नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार ज्ञानेशकुमारच्या बापाचा नाही. पण अमित शहा ज्ञानेशकुमारच्या माध्यमातून तो अधिकार वापरत आहेत.

माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी म्हटले की, भाजपाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि सरकार चालवता येत नाही. उद्धव ठाकरेंनी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजून लोक शांत आहेत. मनमानीपणाने कारभार करणार असाल तर जनता शिक्षा दिल्याशिवाय राहणआर नाही. रस्त्यावर खेचून शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. डोकी गरम होत नाहीत तोपर्यंत या उन्हात तापण्याला अर्थ नाही.

 

आदित्य ठाकरे गायब

या मोर्चात उबाठा शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती मात्र जाणवली. त्यांना ताप आल्यामुळे ते आले नाहीत अशी माहिती देण्यात आली. पण त्यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर शेलक्या भाषेत टिप्पणी केली. ते म्हणाले की, तिच्या “आहो” ना EOW नी अटक केली म्हणुन तिला ताप आला आणि ती आज “गर्जना” मोर्च्याला आलीच नाही म्हणे.. पेहचान कोण ?

 

ज्ञानेशकुमार, राजेशकुमार की ज्ञानेश्वरकुमार?

या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेही उपस्थित होते. त्यांच्या एका विधानावरूनही टीका झाली. त्यांनी ज्ञानेशकुमार यांचा उल्लेख राजेशकुमार असा केला. त्यावरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, निवडणूक जिंकण्याची तर दूरची बात आधी आयुक्तांचं नाव काय ते तरी गूगल करून या. नावातच घसरली गाडी आणि गप्पा मारताहेत विजयाच्या…लोकांमध्ये आता चर्चा रंगणार तुमच्या या भन्नाट ज्ञानाच्या.

याच मोर्चात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचेही भाषण झाले. तेव्हा ते म्हणाले की, ज्ञानेश्वरकुमार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. अनिल देशमुखांनाही मुख्य निवडणूक आयुक्त कोण याची कल्पना नसल्याचे समोर आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा