28.4 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरराजकारणहा गर्जना मोर्चा नव्हे तर फक्त कोल्हेकुई

हा गर्जना मोर्चा नव्हे तर फक्त कोल्हेकुई

ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

Google News Follow

Related

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आरोप करायचे, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा हा ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीला साजेसा कोल्हेकुई मोर्चा होता, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधी पक्षांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज असलेल्या जागतिक प्राणी दिनाचा संदर्भ देत ॲड. शेलार म्हणाले की, आजचा मोर्चा पाहिल्यानंतर त्याचे नाव ‘गर्जना मोर्चा’ नसून ‘कोल्हे कुईचा मोर्चा’ असायला हवे, असे वाटते.

निवडणुकीत स्वतःला यश मिळाले तर सर्व काही योग्य आणि दुसऱ्यांना विजय मिळाला तर निवडणूक प्रक्रिया चुकीची, अशी विरोधकांची भूमिका आहे. ज्ञानेशकुमार निवडणूक आयुक्त झाल्यानंतर झालेल्या सहा निवडणुकांचा संदर्भ देत शेलार म्हणाले की, या सहा निवडणुकांपैकी तीन ठिकाणी भाजप किंवा एनडीएला यश मिळाले, तर केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथे गैर-भाजप पक्षांची सरकारे सत्तेवर आली. पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्ये भाजपला यश मिळाले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करण्यामागे कोणतेही तथ्य नाही. हा तथ्यहीन आणि लबाडीचा आरोप आहे.

निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यापेक्षा जनतेचा कौल स्वीकारण्याची गरज आहे, असे शेलार यांनी सुनावले. महाराष्ट्रात विधानसभा फेरनिवड घ्या असे आज विरोधक म्हणत आहेत त्यांना हे माहीत नाही का? ज्ञानेश कुमारांची नियुक्ती होण्याआधीच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे एकूण विरोधकांचे आक्षेपच हास्यास्पद आहेत.

हे ही वाचा:

शिवाजी पार्कातील कॉक्रोच आंदोलनात ठाण्यातील ज्येष्ठाचा मृत्यू

शेतात राबणार रोबोट्स, ड्रोन

गोल्फमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या प्रणवीला १० लाखांचे इनाम

पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला; AK-47 सह हँड ग्रेनेड जप्त

मग ईव्हीएम चुकीचे कसे?

ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही शेलार यांनी सुनावले. २००७ आणि २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुका ईव्हीएमवर झाल्या आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळाले. २०१७ मध्येही ईव्हीएमच्या माध्यमातून महापालिकेतील सत्ता मिळाली. मग स्वतःचा विजय ईव्हीएमवर झाला तेव्हा तो योग्य आणि इतरांचा विजय झाला की ईव्हीएम चुकीचे, असा सवाल शेलार यांनी केला.

२००९ मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले तेही ईव्हीएमच्या माध्यमातूनच. त्यामुळे ईव्हीएमबाबत आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय इतिहासाकडेही पाहावे. आपण निवडून आलो तर ईव्हीएम चांगले आणि इतर निवडून आले तर ईव्हीएममध्ये घोटाळा, ही भूमिका जनतेला मान्य होणार नाही, असे शेलार म्हणाले. मुळात ईव्हीएम आणण्याचा निर्णयच काँग्रेसने केला. त्यानंतर काँग्रेस काळात निवडणूका झाल्या, काँग्रेस जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगले होते, मग आज भाजपा जिंकल्यावर ईव्हीएम नको? असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे आज एसआयआर रद्द करा, अशी मागणी करीत आहेत. पण त्यांना आठवत नसेल १५ ऑक्टोबर २०२५ ला त्यांनीच मागणी केली होती की, मतदार यादीतील वयाच्या नोंदी मध्ये विसंगती आहेत. तर १९ ऑक्टोबर २०२५ ला ते म्हणाले होते की, ९६ लाख बोगस मतदारांनी मतदार यादी मध्ये आहेत. त्यामुळे याद्या स्वच्छ करा, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका. १ नोव्हेंबर २०२५ उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता. दुबार मतदार यादी आणि कागदपत्रांच्या पडताळणीची मागणी केली होती. ४ नोव्हेंबर २०२५ ला आयोगाकडे याचीच मागणी केली की, दुबार मतदारांवर कारवाई करा. १५ जानेवारी २०२६ ला राज ठाकरे यांनी आरोप केला की, १० लाख दुबार मतदार आहेत त्यांच्यावर कारवाई करा, मग आज आयोगाने कारवाई केली. याद्या स्वच्छ केल्या तर यांना त्रास का होतोय? असा सवाल मंत्री शेलार यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा