30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरक्राईमनामाशिवाजी पार्कातील कॉक्रोच आंदोलनात ठाण्यातील ज्येष्ठाचा मृत्यू

शिवाजी पार्कातील कॉक्रोच आंदोलनात ठाण्यातील ज्येष्ठाचा मृत्यू

आंदोलनातील सहभागादरम्यान हृदयविकाराचा त्रास

Google News Follow

Related

दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर गुरुवारी संध्याकाळी आयोजित कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गोपालकृष्ण सुब्बय्या पिल्लई असे मृताचे नाव असून ते ठाण्यातील रहिवासी होते. या दुर्दैवी घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एरवी प्रत्येक मोर्चात जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या कॉक्रोच पार्टीने पिल्लई यांच्या मृत्यूनंतर कोणती भूमिका घेतली हे समोर आलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’ येथे राहणारे गोपालकृष्ण पिल्लई हे गुरुवारी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवाजी पार्क येथे आले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास ते मैदानावर पोहोचले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मैदानाच्या गेट क्रमांक ६ जवळ चालत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याठिकाणी आंदोलन सुरू असताना कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. पण पोलिसांनी मदत केल्यामुळे आणि एका डॉक्टरने उपचार केल्यामुळे त्या ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णालयात नेता आले.

हे ही वाचा:

फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

भारतीय बॉक्सिंगची वाटचाल ४४व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर!

शेख हसीना यांना भारताने नाही, बांगलादेशच्या लष्करी विमानाने आणले

त्यांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत आलेले मित्र आणि बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांना तात्काळ नजीकच्या ‘सुश्रुषा’ रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून प्राथमिक तपासणीनुसार हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. नातेवाइकांनी या प्रकरणी कोणताही संशय अथवा आक्षेप न घेतल्यामुळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा