सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी प्रमुखांना अटक केली आहे. मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.
बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि संबंधित गुन्ह्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान रवी नारायण यांचे काही लोकेशन्स संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. त्यामुळे यामध्ये रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. यानंतर अखेर काल ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केली आहे.
हे ही वाचा:
थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला
ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ
ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी
रवी नारायण हे एप्रिल १९९४ पासून २०१३ पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रमुख होते. त्यांनी २००९ ते २०१७ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरित्या फोन टॅप केल्याचा आरोप आहे. आरोपींनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशी संबंधित एका कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केले असून या कंपनीचं नाव आयझेक सर्विस प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. यातूनच अनेकांनी बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमावले, अशी शक्यता वर्तवली जात आहे.







