25 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरबिजनेससेन्सेक्स ३६३ अंकांनी वधारला

सेन्सेक्स ३६३ अंकांनी वधारला

शेअर बाजारात पुन्हा तेजी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्यता कमी झाल्याचे संकेत आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी चार दिवसांची घसरण थांबवत दमदार पुनरागमन केले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांहून अधिक वधारला, तर निफ्टीनेही २३,९००चा टप्पा ओलांडला. दिवसभरातील चढ-उतारानंतर सेन्सेक्स ३६२.५७ अंकांनी वाढून ७६,५१५.४३ अंकांवर, तर निफ्टी २४ अंकांनी वाढून २३,८९७.७० अंकांवर बंद झाला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबरमधील बैठकीत व्याजदर वाढ न करण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास मजबूत झाला. अमेरिकेतील प्रमुख शेअर निर्देशांकही एक टक्क्यापेक्षा अधिक वाढून बंद झाल्याचा फायदा भारतीय बाजाराला झाला. मात्र, अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरातील वाढ बाजारासाठी चिंतेचा विषय कायम आहे. ब्रेंट क्रूडचा दर ९६ डॉलरच्या आसपास राहिल्याने महागाई आणि व्याजदरांबाबतची चिंता कायम आहे.
हे ही वाचा:
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षांपूर्वीच एआयबद्दल भाकीत केलं होतं!’

रविवारी चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान ५ तासांचा जम्बो ब्लॉक

मुंबई-दिल्लीपलीकडे होत आहे देशाचा आर्थिक विस्तार

म्यानमारच्या विमानावरील हल्ल्यामागे अमेरिकन भाडोत्री सैनिक

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विमा आणि धातू कंपन्यांच्या समभागांत चांगली खरेदी झाली. एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी बाजाराला आधार दिला. दरम्यान, डेरिव्हेटिव्ह व्यवहारांच्या सेटलमेंट किंमत पद्धतीचा आढावा घेण्याचा निर्णय सेबीने घेतल्याने बीएसई, एंजल वन आणि इतर भांडवली बाजाराशी संबंधित समभागांतही तेजी दिसून आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा